शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लाथाळ्यांवरच ठरणार निकाल

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

काँग्रेसमधील नेतेच सैरभैर : ‘दक्षिणे’तील परिणाम ‘उत्तर’वर उमटणार

भारत चव्हाण -- कोल्हापूर --पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीत चुरस वाढली असली तरी कोण निवडून येणार, हे सांगणे कठीण झाले आहे. तरीही कॉँग्रेस पक्षासमोर शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. उत्तर मतदारसंघावर ‘दक्षिणे’तील खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वीकारलेल्या राजकीय भूमिकेवर हल्लाबोल होणार, हे नक्की मानले जाते. त्यामुळेच कॉँग्रेसची रसद शिवसेनेला मिळून गतनिवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर मतदारसंघाने मागच्या २० वर्षांत शिवसेनेच्या बाजूने कौल दिला असून, शिवसैनिकांच्या उत्साहावर आजही काही परिणाम झालेला नाही. भाजपबरोबरची आघाडी तुटल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर अडचणीत येतील, त्यांना मिळणाऱ्या भाजपच्या मतदानापैकी १८ ते २० हजार मतांची घट होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु, आघाडी तुटल्यामुळे क्षीरसागरांसह त्यांचे सर्व शिवसैनिक जोरदार कामाला लागले. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका स्पष्ट केली. प्रचारसभा, पदयात्रा याद्वारे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव कदम यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली होती. त्यांना अनेक मंडळे, तालीम, संस्थांचा पाठिंबा मिळाला. प्रत्यक्षात त्यांच्या प्रचारात महापालिकेतील कॉँग्रेसच्या ३३ नगरसेवकांपैकी काही मोजकेच नगरसेवक सहभागी झाले. काही नगरसेवकांनी तर थेट विरोधाची भूमिका घेत क्षीरसागर यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, भाजपचे महेश जाधव, मनसेचे सुरेश साळोखे यांना अचानक लढावे लागत असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवून देताना त्यांना घाम फुटला आहे. भाकपच्या रघुनाथ कांबळे यांचीही स्थिती जवळपास तशीच आहे. कार्यकर्त्यांना बांधून ठेवून प्रचारात सक्रिय ठेवणे हे एक मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे आर. के. पोवार काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असून, ते प्रचारातही दिसतात. परंतु, खासदार धनंजय महाडिक यांचे सहकार्य त्यांना मिळत नसल्याचे जाणवते. महाडिक यांचा ओढा नातेवाईक असलेल्या सत्यजित कदमांकडे जास्त आहे. महाडिक कुटुंबाला मानणारे काही नगरसेवक अलिप्त आहेत. त्यावरूनच महाडिक यांचा पाठिंबा आर. के. पोवार यांच्याऐवजी सत्यजित कदम यांना राहील, असे अनुमान काढायला वाव आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये माजी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक उतरल्याने महाडिक-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. ‘दक्षिणे’तील राजकारणाचे परिणाम ‘उत्तर’वर उमटणार, हे निश्चित झाले आहे. कसबा बावडा, लाईन बझार या पट्ट्यातील मतदार सतेज पाटील यांच्या आदेशाची वाट पाहात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या क्षीरसागर यांची पाचही बोटे तुपात आहेत.उत्तर कोल्हापूर एकूण मतदार २,८0,७६६प्रचारातील कळीचे मुद्दे :शहरवासीयांवर लादलेला टोलचा मुद्दा जास्त गाजतोय. सर्वच पक्षांनी टोलमुक्त कोल्हापूर करण्याचे आश्वासन दिले आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने व्यापारी वर्गावर एलबीटी लादल्याचा आरोप होतोय. शिवसेनेने तो रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.रस्ते प्रकल्पातील भ्रष्टाचार, वैयक्तिक संपत्तीवरून टीका.‘नगरोत्थान’मधील अपूर्ण आणि खराब रस्ते.