शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

अध्यक्षपदाचा निकाल ३० सप्टेंबरला

By admin | Updated: September 18, 2014 00:10 IST

चित्रपट महामंडळ वाद: सुनावणी पूर्ण

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या दाव्यावर ३० तारखेला अंतिम निकाल देण्यात येणार आहे. कोल्हापूरातील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश केतकी चव्हाण यांच्यासमोर आज बुधवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर यांच्याविरोधात अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. त्यांना अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांनीही साथ दिली. या तीनही सदस्यांवर कारवाई करण्यात अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत कार्यकारिणी सदस्यांनी विजय कोंडके यांच्याविरोधात अविश्वास ठराव करून त्यांना पदमुक्त केले होते. त्यावर हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत विजय कोंडके यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्यावर आज न्यायाधीश केतकी चव्हाण यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने अ‍ॅड. ए.पी. पोवार व के.व्ही. पाटील यांनी न्यायालयात या विषयावर निर्णय देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला. आज न्यायालयाने वादी आणि प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणावर ३० तारखेला अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर यांनी दिली.