शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:38 IST

उच्च शिक्षणाची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. या निकालात यावर्षी कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला आहे. एकूण ८७.१२ टक्क्यांसह हा विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देबारावीच्या निकालात कोल्हापूर विभागाचा टक्का घसरलाराज्यात पाचवा क्रमांक; विभागात मुलींची आघाडी

कोल्हापूर : उच्च शिक्षणाची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. या निकालात यावर्षी कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला आहे. एकूण ८७.१२ टक्क्यांसह हा विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

या विभागात ८८.१५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा प्रथम, सांगली जिल्हा ८६.५५ टक्क्यांनी द्वितीय, तर सातारा जिल्हा ८६.२६ तृतीय क्रमांकावर आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे मुलांपेक्षा १३.७५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाने ९१ टक्के निकालासह राज्यात द्वितीय क्रमांक कायम राखण्याची हॅटट्रीक साधली होती. अवघ्या पाँईट ४० टक्क्यांनी विभागाचा निकाल घटला होता. मात्र, यावर्षी राज्यात पाचव्या क्रमांकावर कोल्हापूर विभाग पोहोचला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी विभागाच्या निकालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी विभागातून ७९८ कनिष्ठ महाविद्यालयांतून १२५४३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १०९२७९ जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.१२ टक्के आहे. त्यात ७३९०५ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५८६७१ मुले उत्तीर्ण झाली असून त्याचे प्रमाण ७९.३९ टक्के इतके आहे. ५५१८६ मुलींनी परीक्षा दिली असून त्यातील ५१४०१ उत्तीर्ण झाल्या असून त्याचे प्रमाण ९३.१४ टक्के आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३.७५ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी तुलनेत यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात ३.८८ टक्क्यांनी घट झाली आहे.

  1. कोल्हापूर जिल्ह्यातील २९४ महाविद्यालयातील ५१७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ४५५८८ जण उत्तीर्ण झाले.
  2. सांगली जिल्ह्यातील २६३ महाविद्यालयांतील ३५५१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३०७४० जण उत्तीर्ण झाले.
  3. सातारा जिल्ह्यातील २४१ महाविद्यालयांमधील ३८१९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील ३२९५१ जण उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींचा निकाल २१.६७ टक्के लागला असून त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ९.७७ टक्क्यांनी घट झाली आहे. 

या पत्रकार परिषदेस विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव टी. एल. मोळे, शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, राजेश क्षीरसागर, एन. बी. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, बी. आर. स्वामी, बी. डी. आंबी, व्ही. पी. पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkolhapurकोल्हापूर