शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Restrictions : कोल्हापुरातही आता ९ च्या आत घरात, निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 14:35 IST

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोल्हापूर : नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असले तरी राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज शनिवारी दुपारी २ वाजता आदेश लागू केले. जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉन रुग्ण आढळला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हे नियम लागू केले आहेत.राज्यात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या १०८ वर गेल्याने खबरदारी म्हणून राज्य सरकारने काल, शुक्रवारी रात्री नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. मात्र नव्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले. या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. जिल्ह्यात याचे संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र सुदैवाने या रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र प्रशासनाने पुढील धोका टळावा यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात आज पासून असणार हे निर्बंध

  •  रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना बंदी असणार
  •  लग्न समारंभासाठी सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी तितकी असेल. 
  •  क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. 
  •  उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या ठिकाणी असणारी क्षमता पहिली जाहीर करावी लागणार.
  •  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन आधिनियम २००५, व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन