शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या मातीतील ‘सोपस्कार’ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:39 IST

साई-निर्मल क्रिएशन या बॅनरची निर्मिती असलेल्या ‘सोपस्कार’ या कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या आणि कोल्हापूरचे कलाकार असलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या मातीतील ‘सोपस्कार’ला प्रतिसादकोल्हापूरचे कलाकार असलेला चित्रपट

कोल्हापूर : साई-निर्मल क्रिएशन या बॅनरची निर्मिती असलेल्या ‘सोपस्कार’ या कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या आणि कोल्हापूरचे कलाकार असलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.हा चित्रपट गेल्या १२ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव जिल्ह्यात प्रदर्शित झाला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलींचे शिक्षण, त्यांचे करिअर आणि अजूनही त्यांच्या लग्नाबाबत घेतले जाणारे चुकीचे निर्णय या समाजातील वास्तवावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.हा सामाजिक चित्रपट ९0 टक्के कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला आहे. कोल्हापूरच्या एका कुटुंबवत्सल महिलेने धाडस करत बनविलेला हा स्त्रीप्रधान चित्रपट भावस्पर्शी, सामाजिक आशय मांडतो.कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना खऱ्या अर्थाने न्याय देत कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि मूळ संस्कृती जपणाऱ्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरणही कोल्हापूर परिसरातच, विशेषत: गडमुडशिंगी गावात पूर्ण करण्यात आले आहे. उत्तम लोकेशन्स, उत्तम चित्रीकरण, बहारदार संगीत विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सफाईदार हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील जवळपास ९0 चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मराठीच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर झळकलेला हा एकमेव स्थानिक चित्रपट म्हणता येईल.दिग्दर्शक, निर्मात्या, कथा-पटकथा-संवाद, गीते अशी अष्टपैलू जबाबदारी कोल्हापूरच्याच कविता विक्रमसिंह पाटील यांनी साभाळली आहे. आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील दमदार गाणी गायली आहेत.

तेजस चव्हाण यांचे संगीत, संग्राम भालकर यांचे नृत्य, बी. महेंतेश्वर यांचे संकलन, बाबा लाड यांचे छायांकन आहे. चित्रपटात सुमेधा दातार यांची प्रमुख भूमिका असून, धनंजय पाटील, धनंजय पोलादे, प्रिया पाटील अमोल चव्हाण, मंजित माने, अभिषेक पाटील, प्रफुल्ल पाटील, सोनाली पाटील या स्थानिक कलाकारांच्या भूमिका आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर