शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गणरायाच्या गीताला जगभरातून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:54 IST

कोल्हापूर : चिन्मय कोल्हटकर या कोल्हापूरच्या युवा कलाकाराने संगीत दिलेल्या गणेश गीताला केवळ बारा तासांत जगभरातील १००० ‘व्हिवर्स’नीं दाद दिली असून २०० जणांनी हे गीत ‘शेअर’केले आहे.

ठळक मुद्दे १२ तासांत १००० व्हिवर्स : २०० शेअर; ‘शेंदूर लाल चढायो’ गीतकोल्हापूर जिल्'ातील आजरा महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते ही संगीतप्रेमी आहेत. त्यानंतर गेली १७ वर्षे तो संगीतक्षेत्रात रमला आहे.कोल्हापूरचे चिन्मय कोल्हटकर यांनी या गीताला संगीत दिले असून आमोद कुलकर्णी यांनी संयोजन केले आहे.

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चिन्मय कोल्हटकर या कोल्हापूरच्या युवा कलाकाराने संगीत दिलेल्या गणेश गीताला केवळ बारा तासांत जगभरातील १००० ‘व्हिवर्स’नीं दाद दिली असून २०० जणांनी हे गीत ‘शेअर’केले आहे. प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी या गीताचे गायन केले असून शर्वरी जमेनीस यांनी यामध्ये कथ्थक सादरीकरण केले आहे. पाच मिनिटांच्या या गाण्यामध्ये या दोघांनी कथ्थक बंदिशी सादर केल्या आहेत.

प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक यांनी ‘यू ट्यूब’वर ‘धाता’ हे चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवरील पहिल्या व्हिडिओसाठी ‘शेंदूर लाल चढायो’ हे गीत तयार करण्यात आले. कोल्हापूरचे चिन्मय कोल्हटकर यांनी या गीताला संगीत दिले असून आमोद कुलकर्णी यांनी संयोजन केले आहे. संदीप कुलकर्णी यांची बासरी असून निखिल फाटक यांची तबला साथ आहे. पंधरा दिवसांमध्ये या गीताचे ध्वनिमुद्रण करण्यात आले.

गणेशाची स्तुती करणाºया या गीतामुळे प्रसन्न वातावरण अनुभवण्यास मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक रसिकांनी व्यक्त केल्या आहेत. गायक महेश काळे यांनी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी हे गाणे यू ट्यूब, व्हॉटस् अ‍ॅप आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून अपलोड केले आणि जगभरातून या गीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ख्यातनाम तबलावादक पद्मश्री विजय घाटे, अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर, संवादिनी वादक आदित्य ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

महेश काळे यांचा भारदस्त आवाज, उत्तम कोरस आणि शर्वरी जमेनीस यांचे कथ्थक याचा अफलातून संयोग या गीतामध्ये झाला असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसिकांचा हा उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे.चिन्मय कोल्हटकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या आजोबांची गुजरी कॉर्नरला ‘भोजन क्लब कोल्हटकर’अशी खानावळ होती. चिन्मयचे वडील प्रा. सुहास कोल्हटकर हे कोल्हापूर जिल्'ातील आजरा महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते ही संगीतप्रेमी आहेत.

चिन्मयचे बारावीपर्यंतचे शिक्षण आजरा महाविद्यालयात तर तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले; परंतु त्यानंतर गेली १७ वर्षे तो संगीतक्षेत्रात रमला आहे.डॉ. अरविंद थत्ते यांचा शिष्य असलेल्या चिन्मयने पं. सुरेश तळवलकर, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, पं. बिरजू महाराज, पं. झाकीर हुसेन या दिग्गजांना संवादिनी साथ केली आहे.