शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेल लेखन-वाचन स्पर्धेला प्रतिसाद, सक्षम संस्थेतर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 16:06 IST

ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापुरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ब्रेल लेखन-वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अंधबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देब्रेल लेखन-वाचन स्पर्धेला प्रतिसादसक्षम संस्थेतर्फे आयोजन : लवकरच बक्षिस समारंभ

कोल्हापूर : ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापुरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ब्रेल लेखन-वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अंधबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल लिपीची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये, यासाठी सक्षम संस्थेमार्फत ही ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेण्यात आली.

प्रारंभी लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सक्षम संस्थेचे तुषार डोंगरे, विवेक मोरे, भक्ती करकरे, डॉ. चेतन खारकांडे, अंध शाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे, संजय पवार, विनायक पाटिल आदी उपस्थित होते. सक्षमच्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांनी नियोजन केले.ब्रेल लेखन-वाचन स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या ‘थैलीभर गोष्टी’ आणि हेल्पर्स संस्थेच्या नसीमा हुरजूक यांच्या ‘चाकाची खुर्ची’ हे ब्रेल लिपीतील पुस्तक निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी या पुस्तकातील निवडक गोष्टींचे उतारे निवडण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी अशा दोन गटांत पार पडली.कोल्हापुरातील विकास हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, अंध शाळा अशा विविध ५२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.आनंद आणि आत्मविश्वासब्रेल वाचन आणि लेखन या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी परीक्षकांनी वाचनाला सुरुवात केली आणि लेखन सुरू झाले. पाहता पाहता त्यांच्या स्लेटवर कलमांचे सुमधुर आणि वळणदार ठोके ऐकू येऊ लागले. जसजसे लेखन पूर्ण होऊ लागले, तसतसे त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाच्या संमिश्र भावना उमटू लागल्या. त्यानंतर वाचन स्पर्धा सुरू झाली आणि ब्रेल पुस्तकावरील ठिपक्यांवरून त्या विद्यार्थ्यांची बोटे सहजरीत्या फिरू लागली. वाचन करताना त्यांच्या चेहऱ्यावरही पुस्तकातील त्या शब्दांचेही भाव दिसू लागले. स्पर्धा पूर्ण होताच, आत्मीयतेने स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल या स्पर्धकांनी एकमेकांचे हस्तांदोलन केले.

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर