शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना पुन्हा चितपट करू: धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:09 IST

कोल्हापूर : विरोधकांना ऊठसूट महाडिक कुटुंबीय दिसत असून, त्यांनी टीका करण्यापूर्वी आमची विकासकामे बघावीत. गेल्या निवडणुकीत जनतेनेच ‘दक्षिण’ मधून विरोधकांना हद्दपार केले. आगामी निवडणुकीतही त्यांना पुन्हा चितपट करू, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ज्ञानेश्वरी विकास व आनंद दूध संस्था सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत ...

कोल्हापूर : विरोधकांना ऊठसूट महाडिक कुटुंबीय दिसत असून, त्यांनी टीका करण्यापूर्वी आमची विकासकामे बघावीत. गेल्या निवडणुकीत जनतेनेच ‘दक्षिण’ मधून विरोधकांना हद्दपार केले. आगामी निवडणुकीतही त्यांना पुन्हा चितपट करू, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ज्ञानेश्वरी विकास व आनंद दूध संस्था सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. महाडिक म्हणाले, आम्ही द्वेषापेक्षा विकासाचे राजकारण केल्यानेच जनतेने आम्हाला मोठे केले. जिल्ह्यातील जनता आमच्या मागे असल्याने कोणी, कितीही वल्गना केल्या तरी काही फरक पडत नाही. कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गास मंजुरीसह अनेक कामे आपण पूर्णत्वास नेली. आतापर्यंत कामांमुळेच देशात ‘नंबर वन’चा खासदार झालो. ‘आनंद’ दूध व ज्ञानेश्वरी विकास संस्थेचे सर्जेराव पाटील यांनी महिलांचा पैठणी देऊन सन्मान करून आदर्शवत काम केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.‘ज्ञानेश्वरी’चे संस्थापक-अध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांनी समाजाभिमुख कामे केल्यानेच त्यांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविले. अशा कर्तृत्ववान खासदारांच्या मागे कोल्हापूरची जनता ठाम राहील. राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, उपसरपंच तानाजी पाटील, सुदर्शन पाटील, तानाजी यशवंत, उत्तम झांबरे, दाजी झांबरे, पांडुरंग कांबळे, जितेंद्र यशवंत, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, सभासद उपस्थित होते. गीतेश डकरे यांनी स्वागत केले. महादेव लोकरे यांनी आभार मानले.बिनखर्चाची राज्यातील पहिली संस्था‘ज्ञानेश्वरी’ संस्थेत स्थापनेपासून खर्चाचे व्हाऊचरही नावे टाकलेले नाही. बिनखर्चाचा कारभार करणारी राज्यात ही एकमेव संस्था असून, सर्जेराव पाटील यांनी सहकारासमोर आदर्श ठेवल्याचे गौरवोद्गार महाडिक यांनी काढले.