शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

संकल्प आरोग्याचा

By admin | Updated: January 4, 2017 00:01 IST

बालस्वास्थ

सरते वर्ष २०१६ ला निरोप देऊन सन २०१७चे आपण सर्वांनी आपापल्या पध्दतीने स्वागत केले. प्रतिवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना नवनवीन संकल्प सोडले जातात, परंतु अनेकांचे हे संकल्प जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मागे पडतात. कारण संकल्प केला तरी तो पूर्णत्वास नेण्यासाठी जी मनाची जिगर लागते ती अनेकांकडे नसते. त्याचप्रमाणे जुन्या वर्षातील चांगल्या-वाईट घटनांच्या जमा-खर्चाचा आढावा घेतला जातो. सरत्या वर्षात काय कमावले व काय गमावले याचा ताळमेळ मांडला जातो. अनेकांच्या बाबतीत हा आर्थिक उलाढालीचा असतो, तर काही जणांसाठी तो प्रिय-अप्रिय घटनांचा असतो; पण फारच कमी लोक आरोग्याचा जमा-खर्च मांडतात. सरत्या वर्षानुसार वय वाढत जाते. वाढत्या वयानुसार सहसा आरोग्याचा आलेख छोटा होत जातो आणि आजारांचा आलेख मात्र मोठा होत जातो. सर्व आजार औषधाने बरे होतात, अशा भ्रामक समजुतीमुळे, आरोग्य समजावून घेऊन आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा ‘आजार आल्यावर बघू’ या समजुतीवर जास्त विश्वास ठेवला जातो. गेल्या पन्नास वर्षांच्या आजारांचा आढावा घेतल्यास संसर्गजन्य आजारांवर आपण चांगल्यारितीने नियंत्रण मिळविले आहे. देवी, पोलिओ यांचे निर्मूलन झाले आहे. गोवर, घटसर्प, डांग्या खोकला या आजारांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे. कावीळ, मेंदूज्वर, न्यूमोनिया, जुलाब, कांजिण्या, पोलिओ यासारख्या आजारांवर प्रभावी लस उपलब्ध झाल्याने या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या आयुर्मानात मोठी वाढ झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी सन १९४७ मध्ये ३१ वर्षांची असणारी आयुर्मर्यादा आज ६६ वयापर्यंत पोहोचली आहे. विविध शासकीय आरोग्य योजना सरकारी व खासगी आरोग्य केंद्रांमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याने औषधोपचार सुलभ झाले आहेत.परंतु याच कालावधीमध्ये जीवनशैलीशी निगडित मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, दमा, लठ्ठपणा यासारख्या जंतूविरहित आजारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वृद्धापकाळामधील वैद्यकीय आजार, प्रदूषणाशी संबंधित विकार, एचआयव्ही संसर्ग यासारख्या वैद्यकीय समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. जंतूजन्य आजारांसाठी रामबाण ठरलेली जंतुनाशक औषधांची धारदार तलवार त्याच्या अतिरेकी वापराने बोथट होत चालली आहे. आपले आयुर्मान वाढले; पण या आरोग्य समस्यांमुळे ते वाढलेले आयुष्य आरोग्यदायी व चैतन्यमय झाले का, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार टाळणे ही आरोग्यासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. पुरातन भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार आणि योग्य आचरण यांमुळे निरोगी दीर्घायुष्य जगणे शक्य आहे. या नववर्षाचे स्वागत करताना आपल्या विचारांची दिशा रोगाकडून आरोग्याकडे वळवून निरोगी आरोग्याचा संकल्प करूया. मी या सदरातून वर्षभर त्यासंबंधीच तुमच्याशी हितगुज करणार आहे. आरोग्य म्हटले की सर्वांच्याच दृष्टीने त्यास सारखेच महत्त्व, परंतु मुख्यत: लहान मुलांच्या आरोग्याविषयी लोकांत अधिक जागरूकतेची गरज आहे. त्यामुळे लहान मुलांचे आजार, त्याविषयी घ्यावयाची काळजी, पालकांच्या मनांत असलेल्या विविध शंका, त्याच्या संगोपनाविषयीच्या काही चुकीच्या परंतु प्रथा म्हणून चालत आलेल्या प्रथा-परंपरा या सर्वांबाबत मी तुमच्याशी संवाद साधणार आहे.                                                                                                                                        - डॉ. मोहन पाटील (डॉ. मोहन पाटील हे नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.त्यांनी सीपीआरमध्येही बालरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.)