शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

के. पीं.चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

By admin | Updated: December 14, 2014 00:57 IST

पराभवाची जबाबदारी : तरुण चेहऱ्यास संधी देणार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाचा आपण राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठविल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. परंतु, पक्षनेतृत्वांनी अजून राजीनामा स्वीकारला नसला तरी जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन व तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात आयोजित सभासद नोंदणी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण त्याचवेळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे राजीनामा सादर केला आहे. मात्र, पक्षनेतृत्वाने तो अद्याप स्वीकारलेला नाही; पण जनता त्याच त्याच चेहऱ्यांना कंटाळली आहे. त्यामुळे आपण बाजूला होऊन नवीन चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. शिरोळ तालुक्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असणारच आहे. त्याचबरोबर हातकणंगले व इचलकरंजी मतदारसंघाची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल. पक्षाकडून तुम्हाला निमंत्रण येणार नाही, आता तुम्हीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही के. पी. पाटील यांनी केले. पराभूत झाला म्हणून काम थांबवू नका, आम्हीही पराभूत होऊनच आमदार झालो. आता तुम्ही राष्ट्रवादीचे शिरोळचे पराभूत आमदार आहात, कोणावर राग धरू नका, मेहनत करा, यश तुमचेच असेल, असा सल्लाही पाटील यांनी राजेंद्र पाटील यांना दिला. (प्रतिनिधी)