शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गिजवणे ‘आरक्षित’; उमेदवार ‘सर्वसाधारण’

By admin | Updated: January 23, 2017 00:03 IST

बहुरंगी लढतीची शक्यता : राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देण्यासाठी विरोधकांची व्यूहरचना

राम मगदूम ल्ल गडहिंग्लजगिजवणे गट ओबीसी पुरुषासाठी आरक्षित आहे. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातील संजय बटकडली, सतीश पाटील व दिग्विजय कुराडे यांनी ओबीसी दाखले काढले आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील हे एकमेव प्रबळ दावेदार असून, त्यांच्याविरोधात भाजपतर्फे लढण्यास विश्वनाथ स्वामी, बटकडली व कुराडे हे तिघेही इच्छुक आहेत. त्यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढतीची शक्यता आहे.१९५२ ते ६२ अखेर काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नागाप्पाण्णा बटकडली हे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. तेव्हापासून नव्वदअखेर तेच कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचे गाव कडगाव आणि त्यांचा मतदारसंघही कडगाव, यामुळे त्यांच्या नावानेच हा मतदारसंघ ओळखला जायचा. तब्बल चार दशके त्यांनी जिल्हा परिषदेवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.१९९२ मध्ये हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला. त्यावेळी सुलोचना सुरेश बटकडली, क्रांतिदेवी किसनराव कुराडे, कृष्णाबाई चौगुले व सुमन रायकर यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, नागाप्पाण्णांनीच पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध केली आणि क्रांतिदेवी कुराडे यांना संधी मिळाली.१९९७ मध्ये काँगे्रसने अ‍ॅड. सुरेश कुराडे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात सुरेश बटकडली व अ‍ॅड. विकास पाटील यांनी बंडखोरी केली, तर जनता दलातर्फे शिवाजीराव मगदूम यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी पाटील यांना हत्तरकींची, तर बटकडली यांना शहापूरकरांची साथ होती. त्यात बटकडली यांनी बाजी मारली होती.२००२ च्या निवडणुकीत अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकरांची युती झाली. त्यावेळी बटकडली यांनी शहापूरकर गटातर्फे निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे अशोक मोहिते, तर काँगे्रसतर्फे अ‍ॅड. सुरेश कुराडे रिंगणात होते. त्यावेळीही बटकडली यांनीच बाजी मारली.२००७ मध्ये जनता दल व जनसुराज्यची आघाडी होती. त्यावेळी बटकडलींनी जनसुराज्यतर्फे निवडणूक लढविली. शहापूरकर गटाच्या गणपतराव डोंगरेंना काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी मिळाली. त्यांच्याविरोधात काँगे्रसच्या प्रा. किसनराव कुराडे व सतीश पाटील यांनी बंडखोरी केली. मात्र, अवघ्या साडेतीनशे मतांनी पाटील यांचा डोंगरेंकडून पराभव झाला होता.२०१२ मध्ये काँगे्रसने क्रांतिदेवी कुराडे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या शैलजा सतीश पाटील होत्या. शहापूरकर गटही त्यावेळी राष्ट्रवादीसोबत होता. त्यात तब्बल २९०० मतांनी शैलजा पाटील विजयी झाल्या. या ठिकाणी शहापूरकर गटाची ताकद निर्णायक असून, त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व राहणार आहे.मुश्रीफांच्या प्रतिष्ठेचा मतदारसंघगडहिंग्लज तालुक्यातील हा गट कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील हे आमदार मुश्रीफ यांचे निकटवर्ती व प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्या रूपाने गेल्यावेळी प्रथमच या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मुश्रीफ यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, राष्ट्रवादीकडून ही जागा काबीज करण्यासाठी विरोधकांनीही व्यूहरचना चालविली आहे. त्यामुळे मुश्रीफांच्यादृष्टीने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असणार आहे.