शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट सोनं तारण कर्जातून अपहार, रिझर्व्ह बँकेने कडक केले निकष

By राजाराम लोंढे | Updated: June 18, 2025 18:33 IST

मूल्यांकनही कर्जदाराच्या समोरच करावे लागणार

राजाराम लोंढेकाेल्हापूर : सहकारी बँकांच्या सोने तारण कर्जातील अपहाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कडक पावले उचलली आहेत. सोने तारण कर्ज देताना पारंपरिक पद्धतीने न देता, सोनाराने बँकेत येऊन कर्जदार व बँक अधिकाऱ्यासमोर मूल्यांकन करायचे आहे. दागिना, नाण्यावर कितीपर्यंत कर्ज द्यायचे, कर्जदाराची तारण वस्तू सुरक्षित कशा प्रकारे ठेवायची? त्याची जबाबदारी बँकांवर कशी राहणार, याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.बँका, पतसंस्थांच्या एकूण कर्ज वाटपाच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक सोने तारण कर्ज असते. घरातील सोने तारण ठेवले की कर्जदाराची तातडीने गरज निघते. बँकांच्या वसुलीच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित कर्ज असल्याने बँकांचाही त्याकडे अधिक कल असतो; पण अलीकडील काही वर्षांत सोने तारण कर्जामध्ये बँका, पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून अपहाराचे प्रकार वाढले आहेत. कर्मचारी, सोनार हे संगनमताने डल्ला मारताना दिसत आहेत.ही बाब रिझर्व्ह बँकेने गांभीर्याने घेतली असून, याबाबतचे नवीन परिपत्रक काढले आहे. कर्ज देताना चोख सोन्याचे मूल्याकंन करायचे आहे. त्याचबरोबर कर्ज परतफेडीनंतर संबधित कर्जदाराला तारण सोने परत करताना जिन्नसाच्या बँकेकडील नोंदीनुसार त्याला परत करायचे आहे. यामध्ये काही कमी आढळले तर बँकेने ते संबधित कर्जदाराला भरपाई करून द्यायचे आहे. विशेष म्हणजे बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांनीच जिन्नस हाताळायच्या आहेत.

एक किलोपर्यंतच्या दागिन्यांवर कर्जदागिने तारण कर्ज देताना एक किलोपर्यंत दागिन्यांवरच कर्ज द्यायचे. त्याचबरोबर नाणी असतील तर पाच तोळ्यांपर्यंत आता द्यावे लागणार आहे.

अंतर्गत लेखापरीक्षकांवर जबाबदारीबँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षकांवरही तारण जिन्नस तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अचानक तपासणी करून त्याची नोंदीप्रमाणे खातरजमा करण्याच्या सूचना त्यांना आहेत.

सोने तारणावर कर्ज देण्याचे प्रमाण..

  • व्याजासह अडीच लाख : सोन्याच्या मूल्यांकनाच्या ८५ टक्के
  • व्याजासह अडीच ते पाच लाख : मूल्यांकनाच्या ८० टक्के
  • पाच लाखाच्या वर : मूल्यांकनाच्या ७५ टक्के

तारणाची सोपी प्रक्रियासोनेतारण कर्जास सरासरी ७ ते १० टक्के व्याज दर असतो. वर्षात परतफेड करण्याची मुदत असते. सहज उपलब्ध होते आणि दागिन्याच्या किमतीच्या बाजारभावानुसार ८० टक्क्यापर्यंतची रक्कम कर्ज म्हणून मिळते म्हणून त्याकडे ओढा वाढला आहे. परंतु त्यामुळेच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. बँकेच्या सराफालाच हाताशी धरून कर्ज उचलण्याचे प्रकार सुरू झाल्याने रिझर्व्ह बँकेने त्याला चाप लावला आहे.

रिझर्व्ह बँकेचे नवीन निकष चांगले असून, त्याचे पालन बँकांनी केले पाहिजे. कर्मचारी त्याचे पालन करणार की नाही, यावर बँक व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. - अनिल नागराळे (बँकिंग तज्ज्ञ