शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’च्या रचनेबाबतचा अहवाल डिसेंबरअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:06 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) रचनेबाबतचा अहवाल डिसेंबर २०१७ अखेर सादर करण्यात येणार आहे. याबाबत कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) रचनेबाबतचा अहवाल डिसेंबर २०१७ अखेर सादर करण्यात येणार आहे. याबाबत कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती हा अहवाल सादर करणार आहे.महाराष्ट्रामध्ये गतवर्षी मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले होते. त्याची दखल घेत मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या युवक-युवतींसाठी एका संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे जाहीर केला होता. ‘बार्टी’संस्थेच्या माध्यमातून दलित युवक, युवती, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.त्यानंतरदि. ३ जानेवारी २०१७ रोजी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आदेश काढून या संस्थेचे स्वरूप कसे असावे, याबाबत मार्गदर्शन व शिफारस करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची स्थापना केली होती. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे यांची समितीच्या अध्यक्षपदी, तर डी. आर. परिहार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सेनापती बापट रोडवरील ‘बालचित्रवाणी’चे कार्यालय या संस्थेसाठी देण्यात आले आहे. या समितीला आॅक्टोबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ती पुन्हा वाढवण्यात आली असून डिसेंबरअखेर करण्यात आली आहे. त्यानुसार बहुजन समाजाचे कृषी, शिक्षण, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक असे जे प्रश्न आहेत, त्यांचा सर्वंकष अभ्यास करून ते सोडविण्यासाठी ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून काय करता येईलयाबाबत ही समिती शिफारशी करणार आहे.