शहापूर आरोग्य केंद्रात लस विक्री केली जात असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ९ जून रोजी लोकप्रतिनिधींनी केंद्रात अचानक पाहणी केली होती. या पाहणीत लसीच्या व्हाईल संख्येत तफावत निदर्शनास आली होती. त्यामुळे केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत दोषींवर कारवाईची मागणी लावून धरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सुमारे दोन तासांच्या या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. नगरसेवक किसन शिंदे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी, मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या उपस्थितीत पालिकेत झालेल्या बैठकीत केंद्रातील शिपाई घनशाम चौगुले याच्याबाबत तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडे अहवाल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर चौगुले याची लालनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली.
लस प्रकरणातील वादग्रस्त शिपायाची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST