शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:09 IST

विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांची पुण्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांची याच पदावर औरंगाबादला बदली झाली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात कार्यरत असलेले श्रीकृष्ण वाडेकर हे आता कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक असणार आहेत. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक मात्र अजून ठरलेले नाहीत.

ठळक मुद्देप्रादेशिक साखर सहसंचालक पदावर डोईफोडे, सचिन रावळ यांची बदलीश्रीकृष्ण वाडेकर नवे विभागीय सहकार सहनिबंधक

कोल्हापूर : विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांची पुण्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांची याच पदावर औरंगाबादला बदली झाली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात कार्यरत असलेले श्रीकृष्ण वाडेकर हे आता कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक असणार आहेत. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक मात्र अजून ठरलेले नाहीत.अव्वर सचिव मं. ग. जोशी यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार राज्यातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात कोल्हापुरातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहकारचे कोल्हापूर विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत असलेले धनंजय डोईफोडे आता पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक पदाचा कार्यभार घेणार आहेत.

त्या जागेवर कार्यरत असलेले शशिकांत घोरपडे यांना पणन संचालनालय पुणेचे सहसंचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्या जागेवर यापूर्वी कोल्हापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून काम केलेले वाय. व्ही. सुर्वे हे कार्यरत होते. सुर्वे यांना नियुक्तीचे आदेश स्वतंत्ररीत्या काढले जाणार आहेत.

डोईफोडे यांच्या जागेवर पुण्याचेच श्रीकृष्ण वाडेकर हे येत आहेत. त्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात काम केले आहे. आगामी वर्षभर कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम कारखान्यासह बड्या सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत.

निवडणूक प्राधिकरणात केलेल्या कामाचा अनुभव यावेळी उपयोगी पडणार आहे. डोईफोडे यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार विभागाला शिस्त लावण्याबरोबरच शेतकरी कर्जमाफीसारख्या क्लिष्ट आणि वेळखाऊ कामातही चांगली चमक दाखविली.

कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून वादग्रस्त कारकीर्द ठरलेले सचिन रावळ यांनी याच पदावर औरंगाबाद विभागात रिक्त जागेवर बदली झाली आहे. रावळ यांच्या जागी अजून कोणाचेही नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. ही जागा रिक्त दिसत आहे.

मुळातच गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक साखर सहसंचालक या विभागालाच मरगळ आल्यासारखी स्थिती आहे. एखादा खमका अधिकारी आणण्याची गरज असताना, अजून कुणाचेही आदेश दिले नसल्याने हे पदही रिक्त राहते की काय अशी चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.

मुळातच कोल्हापूर विभागाकडील ३८ कारखाने आणि उच्चांकी गाळपामुळे राज्यात या विभागाचा लौकिक आहे; पण त्याला साजेसा अधिकारी दिला जात नसल्याने प्रादेशिक साखर सहसंचालक हे अधिकारी पद कोल्हापुरात चेष्टेचा विषय आहे. 

 

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूर