शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तटबंदीची दुरुस्ती करा, दलित महासंघाचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:20 IST

fort, kolhapur, Archaeological Survey of India शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडाची अनेक वर्षांपासून पडझड सुरु आहे. याकडे तहसिलदार, वनविभाग, पंचायत समिती तसेच पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत आले आहे. या उदासिन प्रशासनाविरोधात भारतीय दलित महासंघ १५ डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख राजीव सोरटे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकिल्ले पन्हाळगडाची पडझड, तटबंदीची दुरुस्ती करादलित महासंघाचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन

पन्हाळा/कोल्हापूर : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडाची अनेक वर्षांपासून पडझड सुरु आहे. याकडे तहसिलदार, वनविभाग, पंचायत समिती तसेच पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत आले आहे. या उदासिन प्रशासनाविरोधात भारतीय दलित महासंघ १५ डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख राजीव सोरटे यांनी दिली आहे.किल्ले पन्हाळगडाची गेल्या कित्येक वर्षापासून पडझड सुरू आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. काही ठिकाणी पन्हाळगडाची तटबंदी पूर्णत: ढासळली आहे. याकडे असेच दुर्लक्ष झाल्यास माळीण गावाप्रमाणे पन्हाळाही खचण्याची शक्यता भारतीय दलित महासंघाने पुरातत्व खात्यासह स्थानिक प्रशासनाला दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.पन्हाळगडाच्या पायथाशी असणारी गावे तसेच पन्हाळगडावरील रहिवाशी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची प्रशासन वाट पहात आहे, का असा सवालही महासंघाने केला आहे. पन्हाळगडावरील पडझडीच्या दुरुस्तीबाबत पुरातत्त्व विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. या उदासिन प्रशासनाला जाग आणण्यासाठी महासंघाचे कार्यकर्ते १५ डिसेंबरपासून पन्हाळा तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे.पन्हाळा तहसिल, नगरपरिषद, वन विभाग, पंचायत समीती, भारतीय पुरातत्व विभाग, पन्हाळा पोलिस निरिक्षक यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन महासंघाने दिले आहे. या निवेदनावर पन्नालाल इंगळे, सतिश कासे, प्रदिप माने, चंद्रकांत काळे, सागर घोलप, मनोहर खोत, गणेश कांबळे, आकाश कांबळे, विक्रम समुद्रे, कादीर मुजावर, मिलिंद जवंजाळे, शितल गवंडी, अक्षय सोरटे, शाम बानकर, संग्राम बानकर, गणेश गायकवाड, प्रविण राऊत आणि सागर कांबळे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणFortगडkolhapurकोल्हापूर