शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा स्मशानभूमीत विसावा शेडचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:27 IST

पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था होत आहे.

ठळक मुद्देपंचगंगा स्मशानभूमीत विसावा शेडचे नूतनीकरणप्रशस्त बैठक व्यवस्था, मुबलक पाण्याची सोय

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था होत आहे.करवीर काशीमुळे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला वेगळे महत्त्व आहे. उपनगरांसह आसपासच्या काही गावांमधील मृतदेहांवर येथे अंत्यविधी होतो. दररोज १० ते २० मृतदेहांवर अंत्यविधी होतो. बेडची संख्या कमी असल्यामुळे अंत्यविधीला आलेल्यांना काही वेळेस ताटकळत थांबावे लागते. जागेअभावी स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाला अडचणी आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथे नव्याने सहा बेड तयार केले आहेत.स्मशानभूमीमध्ये काही विशिष्ट दिवशी रक्षाविसर्जनाला गर्दी होते. त्यामुळे येथील शेड अपुरे पडत होते. शेड जुने झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होत होता. यामुळे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून चांगल्या दर्जाचे विसावा शेड उभारण्यात येत आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू आहे. पूर्वीचे शेड अपुरे होते. दोन नवीन शेड उभारण्यात येत आहेत. तसेच बैठक व्यवस्थाही प्रशस्त आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनाला येणाऱ्यांची बसण्याची चांगली सोय होत आहे.

पंचगंगा स्मशानभूमीला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे फायद्याचा विचार न करता येथील काम करीत आहे. संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, वृक्षलागवड केली जाणार आहे. कामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन टप्प्यांत काम केले जाणार आहे.- सतीश पाटील, ठेकेदार

 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर