शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’ने उभारलेले शेड काढा

By admin | Updated: May 30, 2014 01:57 IST

महापौर महापालिकेची पूर्वपरवानगी न घेतल्याने आदेश

कोल्हापूर : टोलनाक्यांवरील बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना विश्रांतीसाठी ‘आयआरबी’ने टोलनाक्यांवर पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. महापालिकेची पूर्वपरवानगी न घेताच उभारलेल्या या शेड तत्काळ काढून टाकाव्यात, असे आदेश महापौर सुनीता राऊत यांनी आज, गुरुवारी दिले. ‘आयआरबी’कडे पोलीस प्रशासन बंदोबस्त देताना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही आहे.मात्र महापौरांच्या आदेशामुळे टोलविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने फुलेवाडी नाक्याची मोडतोड केल्याप्रकरणी महापौर सुनीता राऊत यांच्यासह ३२ कार्यकर्त्यांना तीन लाख नुकसानभरपाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच जिल्'ात बंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. आंदोलन चिरडण्यासाठीच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ‘आयआरबी’चा हा डाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नोटिसींचा वचपा काढण्यासाठी महापौरांनी ‘आयआरबी’ने टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर नाक्यांवर पोलिसांसाठी उभारलेले पत्र्याचे शेड काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. या शेड उभारणीसाठी ‘आयआरबी’ने महापालिकेची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. यामुळे उद्या, शुक्रवारी महापालिकेतर्फे या शेड काढल्या जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यात आता पावसाळा सुरू होत असल्याने पोलिसांच्या समस्यांत आणखी भरच पडणार आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीसाठी शेड, तसेच शौचालय उभारण्याची मागणी पोलिसांनी ‘आयआरबी’कडे केली होती. यानुसार ‘आयआरबी’ने काल, बुधवारी पोलिसांना बसण्यासाठी टोलनाक्यांवर पत्र्याचे शेड उभारले आहेत. दरम्यान, या शेड उभारण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याने या शेड काढून टाकण्याचे आदेश महापौरांनी आज दिल्याने ‘आयआरबी’ विरुद्ध महापालिका असा नवीन संघर्ष येत्या काही दिवसांत उफाळणार आहे.