शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उर्वरित आयुष्य धनगर आरक्षणासाठी खर्ची: गणपतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:38 IST

कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी दुपारी धनगर समाजातील आदर्श ...

कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी दुपारी धनगर समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि धनगरी लोकसंस्कृती सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या हस्ते देशमुख यांचा सन्मानचिन्ह, शाल, घोंगडे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, आमच्या समाजाचे अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्न आहेत. हा समाज मागास आहे. जे शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही; म्हणूनच या प्रश्नासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालणार आहे.यशवंत युवा सेनेचे अध्यक्ष विवेक कोकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. बाबूराव हजारे, सहायक पोलीस निरीक्षक जानकर, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा काळबाग, डॉ. दीपक शेंडगे, सुधाकर बदरणे यांच्यासह धनगर समाजातील कर्तबगारांचा सत्कार केला. अमरसिंहराजे बारगळ, भूषणसिंह होळकर, रेणुका शेंडगे, प्राचार्य शिवाजीराव दळणार, बबन रानगे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, सुलोचना नाईकवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.धनगरी ढोलांनी मुंबई घुमणारमाजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. आरक्षणासाठी म्हणून २0१४ साली आम्ही सरकार बदलण्यासाठी साथ दिली. मात्र सरकारने केवळ चर्चा करण्याशिवाय काहीही केले नाही. प्रत्येक बैठकीमध्ये आरक्षणाला मुद्दा जोरदारपणे मांडत होतो; पण आता मला बैठकीलाच बोलवायचे बंद केले आहे. मात्र आता आरक्षणासाठी मुंबईत असे काही ढोल बडवू की त्यांचा आवाज घुमेल आणि तो मंत्रालयापर्यंत जाईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला. हे सरकार खाली खेचण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना याचा जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.धनगरी संस्कृतीचे दर्शनरविवारी दुपारी शाहू स्मारक परिसरात धनगरी संस्कृतीचेच दर्शन घडले. उचगाव येथील मंगोबा ओवीकर मंडळाने सादर केलेल्या ओव्या, शाहीर डॉ. अमोल रणदिवे यांनी सादर केलेला अहिल्यादेवींचा पोवाडा, आटपाडी येथील बिरूदेव गजी मंडळ निंबवडे यांचे गजीनृत्य यांमुळे वातावरण जल्लोषी बनले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी शाहू स्मारक भवन दुमदुमून गेले.