शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे धार्मिक विधी उद्यापासून

By admin | Updated: July 21, 2015 01:01 IST

रासायनिक प्रक्रिया : उत्सवमूर्तीचे पितळी उंबऱ्यापासून दर्शन

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यानच्या धार्मिक विधींना बुधवारपासून (दि. २२) प्रारंभ होत आहे, अशी माहिती श्री करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाचे अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापूजेने सुरू होणाऱ्या या विविध विधी गुरुवारी (दि. ६ आॅगस्ट) ला पुन:प्राणप्रतिष्ठा व अवभृत स्नानाने पूर्ण होतील. ते म्हणाले, श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते बुधवारी महापूजेने धार्मिक विधी सुरू होतील. भाविकांच्या सोयीसाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती पितळी उंबरा येथे ठेवण्यात येणार आहे. येथे देवीच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सर्व नित्य धार्मिक विधी होतील. या काळात देवीचा नित्य अभिषेकवगळता देवस्थान समिती व श्रीपूजकांकडून बाहेरच्या भक्तांचे अभिषेक घेतले जाणार नाहीत. विधींचा खर्च श्रीपूजकांनी करायचा असल्याने भाविकांकडून कोणत्याही स्वरुपातील देणगी स्वीकारली जाणार नाही. पत्रकार परिषदेस ऐश्वर्या मुनिश्वर, गजानन मुनिश्वर, अ‍ॅड. केदार मुनिश्वर, गजानन नारायण मुनिश्वर, शेखर मुनिश्वर, आदी उपस्थित होते. मूर्तीचे दर्शन गुरुवारपासून बंद बुधवारी व गुरुवारी अंबाबाई मूर्तीमधील प्राणतत्त्व कलशामध्ये काढण्याचा विधी होणार आहे. हा विधी झाला की गुरुवारी मूर्ती पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविली जाईल. त्यामुळे गुरुवार सकाळपासून ६ आॅगस्टच्या दुपारपर्यंत अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. पंडित राजेश्वरशास्त्री जोशी, उप्पनबेट्टीगिरी (धारवाड) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या विधींचे मुख्य आचार्य वेदमूर्ती सुहास जोशी असून, वेदमूर्ती अनिरुद्ध जोशी व प्रसाद निगुडकर हे साहाय्य करणार आहेत.