शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निवळीतील ‘त्या’ २९ कुटुंबांना जमिनी परत-मुरगूड पोलिसांचे सामंजस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:47 IST

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथे वसविलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या जमिनीवर काही मूळ मालकांनी न्यायालयातून आदेश आणून ताबा मिळविला, तर काहीनी आदेश नसतानाही आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर प्रशासनासह मुरगूड पोलिसांच्या मदतीने न्यायालयाचा आदेश नसताना ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून २९ ...

ठळक मुद्दे४१ कुटुंबांना मात्र जमिनीची प्रतीक्षाच, १९९९ मध्ये चांदोली धरण क्षेत्रातील विस्थापित

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथे वसविलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या जमिनीवर काही मूळ मालकांनी न्यायालयातून आदेश आणून ताबा मिळविला, तर काहीनी आदेश नसतानाही आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर प्रशासनासह मुरगूड पोलिसांच्या मदतीने न्यायालयाचा आदेश नसताना ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून २९ कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांना परत केल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनी गेलेल्या २८ कुटुंबीयांसह अद्याप जमिनी न मिळालेले १३ कुटुंबे जमिनीच्या प्रतीक्षेतच आहेत.

१९९९ मध्ये चांदोली धरण क्षेत्रात अभयारण्य उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील सात गावे विस्थापित करण्यात आली. यामध्ये निवळीचाही समावेश होता. या गावातील काही कुटुंंबे किणी-वाठार येथे, तर ७० कुटुंबांचे पुनर्वसन कागल तालुक्यातील गलगले येथे झाले. प्रत्येक कुटुंबाला गावठाणात चार गुंठे जागा, तसेच उदरनिर्वाहासाठी शेतजमिनीही दिल्या. या जमिनी मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागला. २००७ पर्यंत टप्प्याटप्प्याने ५८ कुटुंबांना गलगलेसह खडकेवाडा, हमिदवाडा, मुगळी याठिकाणी जमिनीचे वाटप करण्यात आले. तर, अद्याप १३ कुटुंबांना जमिनी मिळालेल्याच नाहीत. यापैकी काहींनी पुनर्वसनास घेतलेल्या जमिनीबाबत न्यायालयात धाव घेतली. तर, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीवर ताबापट्टी घेतली. न्यायालयाच्या निकालाबाबत प्रशासनाकडून आदेश आल्यानंतर २८ कुटुंबीयांनी आपल्या जमिनी मूळ मालकांना परत केल्या. तर आम्हीही न्यायालयात जाऊन आदेश प्राप्त करू, असे सांगत आदेश नसतानाही हमिदवाडा, खडकेवाडा, मुगळी येथील शेतकºयांनी जमिनीवर ताबा मिळविला. त्यामुळे या विस्थापित कुटुंबांनी संघटनेसह प्रशासनाकडे धाव घेतली होती.४१ कुटुंबांची परवडच...!गतमहिन्यात न्यायालयाच्या आदेशामुळे २८ कुटुंबांना १५ वर्षांपासून ताब्यात असलेल्या जमिनी सोडाव्या लागल्या.तर ७० कुटुंबाुपैकी १३ कुटुंबे अद्यापही जमिनी मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे एकदंरित ४१ कुटुंबांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागणार आहे.याकडे या कुटुंबाना विस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलेले जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.धरणग्रस्तांची अशीही सामंजस्यता...कोणताही पुरावा नसताना काही मूळ मालकांनी या विस्थापित कुटुंबांच्या जमिनीवर ताबा मिळवला; परंतु कोणताही तंटाबखेडा न करता या कुटुंबांनी त्यांना हक्क दिला. प्रशासनाच्या माध्यमातून २९ कुटुंबांना जमिनी परत मिळाल्या. मात्र, या कुटुंबांनी मूळ मालकांनी पेरणीसाठी बी-बियाणे, मजुरी, आदींचा आलेला खर्च देऊन सामंजस्यता जपली. 

कोणताही ठोस पुरावा नसताना विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीवर हक्क सांगता येणार नाही. याबाबत न्यायालयाचा आदेश नसणाºया शेतकºयांना समजावून सांगितले. त्यांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे या जमिनी संबंधित विस्थापित कुटुंबे कसू शकतात.- विठ्ठल दराडे, सहा. पोलीस निरीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना