शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू समाजाच्या बक्षिसपत्रासाठी दस्त अट शिथिल करावी : शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:53 IST

मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील

ठळक मुद्दे कोल्हापूर  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभारतातील हिंदंूना एक कायदा व मुस्लिम समाजाला एक कायदा हे अन्यायकारक

कोल्हापूर : मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

संजय पवार म्हणाले, मुस्लिम समाजाला हिबा या कायद्याप्रमाणे तोंडी स्वरूपात बक्षिसपत्र असेल व बक्षिसासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता झाली असेल, तर ते कायदेशीर मानले जाते. तोंडी बक्षिस पत्रासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी नोंदणी केलेला दस्त हवाच, अशी कोणतीही अट नाही; परंतु हिंदू समाजाला मात्र बक्षिसपत्रासाठी स्टॅँप ड्यूटी भरावी लागते. तसेच एक टक्का एलबीटीही त्यांना भरावा लागतो; त्यामुळे मुस्लिम समाजाची सवलत बंद न करता हिंदूंनाही त्याप्रमाणे सवलत द्यावी.

निवेदनात म्हटले आहे की, ‘खलीलउल्ला वि. इवाजअली ए. आय. आर. २२३ औध २१४’ या मुस्लिम कायद्याप्रमाणे बक्षिस पत्रासाठी नोंदणीची गरज नाही. भारतातील हिंदंूना एक कायदा व मुस्लिम समाजाला एक कायदा हे अन्यायकारक आहे. अनेक कुटुंबात बक्षिस पत्रावरून किंवा स्टॅँप ड्यूटी भरण्यावरून संघर्ष सुरू आहेत. अनेक ठिकाणी कायदेशीर लढाई सुरू आहे, तरी हिंदू समाजालाही १०० ते ५०० रुपये स्टॅँपवर बक्षिसपत्र करण्यासंदर्भात शासनाने कायदा करून दिलासा द्यावा.शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, प्रा. शिवाजी पाटील, राजू यादव, राजू पाटील, दिलीप देसाई, शशिकांत बिडकर, दिनेश परमार, रणजित आयरेकर, विराज ओतारी, रफिक नायकवडी, संजय जाधव, दिलीप जाधव, संदीप पाटील, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर