शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मंडलिक-सीमावासीयांमधील ऋणानुबंध’ दृढ--मल्टिस्टेटचा नवा आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 20:32 IST

म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती

ठळक मुद्देसीमाभागातील १४ गावांना लाभ; स्वप्न पूर्ण होणार असल्याने नवचैतन्यराज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती. मात्र, प्रा. संजय मंडलिक यांच्यासह मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांनी मंडलिक कारखाना बहुराज्य (मल्टिस्टेट) करून सीमावासीयांनाही सभासदत्वासह या कारखान्याचे मालकत्व देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमधील ऋणानुबंध आणखी दृढ होणार आहेत. तसेच गेल्या दशकापासून या कारखान्याच्या सभासदत्वाची आस लागलेल्या सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सीमावासीय आपले मतदार नाहीत, याची कल्पना असतानाही केवळ मानवता धर्म पाळत दिवंगत लोकनेते मंडलिक सीमावासीयांच्या मदतीला धावून गेले. शेतीसाठी आवश्यक असणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविली. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून मंडलिक आणि सीमावासीयांचे ऋणानुबंध घट्ट जोडले गेले. मतदान करू शकत नसले तरी त्यांनी मंडलिकांची नेहमीच पाठराखण केली.

१९९५ मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी पाटबंधारे राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच काळम्मावाडी धरणातील पाणी वाटपाचा योग्य असा निर्णय घेण्याचा चंग बांधला. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन म्हाकवेहून पूर्वेकडे सीमाभागात जाणाºया आणि शेंडूर, करनूरकडील कच्च्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. तसेच ऐन जानेवारीपासून कोरड्या पडणाºया वेदगंगा नदीत आदमापूरच्या ओढ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, कच्च्या कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडणे धोकादायक आणि नियमबाह्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, होणाºया सर्व परिणामाला आणि जोखमीला आपण स्वत: जबाबदार असल्याचे सांगत मंडलिकांनी आपलाच शब्द खरा केला. त्यांच्या निर्णयाने सीमाभाग पाणीदार बनला.

त्याचबरोबर राज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती. यावेळीही सीमावासीयांनी मतपेटीतून पाठबळ देणे अशक्य असले तरी लोकवर्गणी जमा करून म्हाकवे (ता. कागल) येथील प्रचारसभेत आर्थिक पाठबळ दिले होते. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचे संंबंध होते. अगदी मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सीमावासीयांनी कारखाना कार्यस्थळावर उपस्थिती लावली होती.दरम्यान, मंडलिकांच्या निधनानंतर हे भावबंध तुटले जातील की काय, अशी शंका वाटत होती. मात्र, मंडलिक कारखाना बहुराज्यीय करण्याच्या निर्णयामुळे हे ऋणानुबंध पूर्वीइतकेच दृढ होतील यात तीळमात्र शंका नाही....तर सीमाभागात कागल इतकेच सभासदकागल तालुक्यामध्ये राजकारणासह साखर कारखानदारांमध्ये ऊसदराची नेहमी चढाओढ असते. तसेच शेतकºयांना विविध योजना पुरविण्यातही स्पर्धा सुरू आहे. याचे मोठे आकर्षण सीमावासीयांना आहे. त्यामुळे येथील कारखान्यात सभासद होण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच उत्सुक असतात.मंडलिक कारखान्याने तर उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवत सभासदांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे मल्टिस्टेटचा कायदेशीर मार्ग मोकळा होताच कागलच्या बरोबरीने सीमाभागातील सभासद होतील, असे जाणकारांचे मत आहे. 

 

केवळ साखर निर्मितीपुरते मर्यादित न राहता कारखाना कार्यस्थळावर शिक्षण, आरोग्य सुविधा, माती परीक्षण, प्रयोगशाळा, आदी सर्व सुविधा देऊन हा कारखाना कल्पवृक्ष व्हावा, तसेच मंडलिक साहेबांच्या स्वप्नातील कारखाना बनविण्यासाठी या कारखान्याची बहुराज्य नोंदणी करून घेऊ.- प्रा. संजय मंडलिक, अध्यक्ष, ‘सदा’साखर, हमीदवाडा‘दिवंगत मंडलिक आणि सीमावासीयांचे अतूट नाते आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मंडलिक कारखान्यामध्ये सभासद होण्यासाठी सीमावासीय आतूर आहेत. बहुराज्यीय कायद्याखाली या कारखान्याची नोंदणी त्वरित होऊन आम्हाला सभासद होण्याची संधी लवकर उपलब्ध व्हावी.’- अमर शिंत्रे (कुर्ली) व शिवाजी साखरे (हदनाळ, ता. चिक्कोडी)