आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न निकालात काढा मगच प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्याहस्ते करावे, अशी मागणी धरणग्रस्तांनी निवेदनातून केली आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून काही प्रश्न सुटले. मात्र, अनेक प्रश्न जिल्हास्तरावरून सुटणे शक्य असताना मंत्रालय, आयुक्त कार्यालयाकडे पाठवून धरणग्रस्तांचे प्रश्न गुंतागुंतीचे बनविण्याचे काम अधिकारी वर्गाकडून केले जात आहेत.
अधिकारी वर्ग सोयीचा अर्थ काढून धरणग्रस्तांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी पूजन करताना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, सचिन पावले, महादेव खाडे, शिवाजी गुरव, बजरंग पुंडपळ, शिवाजी गुरव, सखाराम कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या प्रश्नासंबंधी एकत्रित आलेले धरणग्रस्त.
क्रमांक : २००८२०२१-गड-०९