शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘प्रादेशिक परिवहन’ची गाडी ‘एजंट’ मुक्त होणार

By admin | Updated: March 2, 2017 00:55 IST

वाहन ४.० प्रणाली कार्यान्वित : आजपासून सर्व परवाने, कर, शुल्क आॅनलाईन भरता येणार

सचिन भोसले ---- कोल्हापूर-- प्रादेशिक परिवहन कार्यालयात आता नागरिकांना मध्यस्थ अर्थात दलालांची मदत घेण्याची गरज भासणार नाही. आज, गुरुवारपासून सर्व परवाने, शुल्क, कर हे ‘वाहन ४.०’ संगणक प्रणालीतून आॅनलाईन पद्धतीने वाहनधारकांना भरता येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रणालीत वाहन विक्रेत्यांची जबाबदारी वाढणार आहे. आतापर्यंत ‘प्रादेशिक’मध्ये वाहन चालविण्याचा परवाना शुल्क, वाहन नवीन नोंदणी शुल्क, तात्पुरती नोंदणी, परिवहन विभाग नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, नावात बदल अथवा पत्त्यांमध्ये बदल करण्याचे शुल्क, आदी कामे ही वाहनधारकांना मध्यस्थ घेतल्याशिवाय होत नाहीत असा सर्वसामान्यांचा कयास असे. आता मात्र, ही सर्व कामे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. ही कामे आता घरबसल्या इंटरनेट अथवा मोबाईलवरून करता येणार आहेत. यासाठी परिवहन कार्यालयाने देशातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ‘वाहन ४.०’ ही संगणक प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यात घरबसल्या आपल्या पुराव्यांची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यानुसार वाहन परवाना असेल, तर त्याला चाचणी देण्यासाठी अपॉर्इंटमेंटची तारीख, तर शुल्क भरायचे असतील तर ते आरटीजीएस, मोबाईल बँकिंगद्वारेही भरले जाऊ शकणार आहे. यात वाहनधारक ते थेट कार्यालय असा संपर्क होणार आहे. नवीन वाहन खरेदी केले असेल तर कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारीही वाहन विक्रेत्यांची राहणार आहे. या प्रणालीत आपले काम कुठल्या पातळीवर आहे. त्यात कुठली कागदपत्रे अपूर्ण आहेत. त्याचा संदेश मोबाईलवर देण्याची सोय आहे. विशेष म्हणजे कागदपत्रे (पेपरलेस) काम करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याशिवाय थेट आॅनलाईन पद्धतीने शुल्क, फी, दंड, थकीत कर, आदी भरू शकणार आहोत. त्यामुळे एकूणच हे कार्यालय ‘कॅशलेस’कडे वाटचाल करणार आहे. या प्रणालीमुळे टप्प्या-टप्प्याने हे कार्यालय रोकड स्वीकारणार नाही. या संगणक प्रणालीमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतील वाहनधारकांना ‘आरटीओ’संदर्भातील व्यवहार हे घरबसल्या करता येणार आहेत. ही प्रणाली एनआयसीकडून कार्यान्वित केली जात आहे. वाहन विक्रेत्यांना या प्रणालीत युजर आयडी दिला जाणार आहे. नवीन वाहन विक्रीनंतर त्यांच्या कार्यालयातून पैसे भरण्याची व कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा या प्रणालीतून मिळणार आता थेट फॅन्सी नंबरचाही ‘ई’आॅक्शनदुचाकी अथवा चारचाकी गाडीला फॅन्सी नंबर हवा असेल तर शुल्क भरा, धनाकर्ष काढा, असे सर्व सोपस्कर करावे लागत होते. यापुढे घरबसल्या इच्छुक वाहनधारकांना फॅन्सी नंबरच्या लिलावामध्ये मोबाईल इंटरनेटद्वारे सहभागी व पैसेही भरता येणार आहेत. सन १९८९ च्या केंद्रीय मोटारवाहन कायदा विषय ४२/४७ ला अधीन राहून नोंदणीबाबत वाहन विक्रेत्यांची जबाबदारी आहे. त्यात काही घटना घडल्यानंतर कागदपत्रे पुरविण्याची जबाबदारीही विक्रेत्यांची आहे. त्यामुळे ‘वाहन ४.०’ या संगणक प्रणालीत विक्रेत्यांचा रोलही महत्त्वाचा ठरणार आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे कार्यालय दलालमुक्त केले जाणार आहे. - डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी