शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळात सत्तांतर

By admin | Updated: April 27, 2016 01:14 IST

मेघराज राजेभोसले यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्याची ग्वाही देत, नवीन चेहरे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या मेघराज राजेभोसले, पुणे यांच्या ‘समर्थ पॅनेल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला. रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या १३ पैकी १२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. शहरातील राम गणेश गडकरी सभागृहात (पान १० वर)‘समर्थ’चे विजयी उमेदवार : वर्षा उसगावकर (अभिनेत्री)-५६६. चैताली डोंगरे (रंगभूषा) - ५९३. शरद चव्हाण (ध्वनीरेखक)- ६२१. संजय ठुबे (निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा)- ५२०. रणजित (बाळा) जाधव (कामगार)- ७५८. मेघराज राजेभोसले (निर्माता गट)-६१४. पितांबर काळे (लेखक गट)-७१८. मधुकर देशपांडे (प्रदर्शन, वितरण गट)- ६४९. निकिता मोघे (संगीतनृत्य, पार्श्वगायन गट)- ६०६. धनाजी यमकर (स्थिर चलत छायाचित्रण)-५८९. विजय खोचीकर (संकलन गट). सतिश रणदिवे (दिग्दर्शक गट) क्रियाशील पॅनेलचे विजयी उमेदवार : सतीश बिडकर (कला प्रसिध्दी गट)दिग्गजांची घालमेलमतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून विजय पाटकर, मेघराज राजेभोसले, पूजा पवार, विजय कोंडके, माजी अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ संचालक भालचंद्र कुलकर्णी आदी दिग्गज थांबून होते. मतमोजणीच्या प्रक्रिये दरम्यान त्यांची मोठी घालमेल सुरू होती. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निकाल तब्बल बारातासानंतर जाहीर झाला. त्यामध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्यासह विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर, अनिल निकम, बाळकृष्ण बारामती यांना पराभवाचा धक्का बसला. संथगतीने झालेल्या मतमोजणीबद्दल उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.मतमोजणीचा एकूण कल पाहता व राजेभोसले यांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता त्यांच्या पॅनेलने बहुमताकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसत होते. महामंडळाच्या सन २०१६-२० या पंचवार्षिक निवडणुकीच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनेल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महामंडळाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक पॅनेल आणि सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरील मतपत्रिकांच्या एकत्रिकरणानंतर दुपारी बारा वाजता गटनिहाय चौदा टेबलांवर मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. दुपारी चार वाजता पहिल्या टप्प्यात रंगभूषा, ध्वनिरेखक, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा, कामगार या पाच विभागांतील मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनेलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. या पाच विभागांत एकूण ६५९ मते बाद झाली. पहिल्या टप्प्यातील निकालात पाच जागांवर बाजी मारल्यानंतर समर्थ पॅनेलच्या समर्थकांनी मेघराज राजेभोसले आणि विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर विजयाच्या घोषणा व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. रात्री साडेनऊनंतर उर्वरित नऊ विभागांतील मतमोजणीला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)