शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कोणतीही असो, अमूल्य मताचा अधिकार बजावा - चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 14:09 IST

निवडणूक कोणतीही असली तरी मतदानाचा अमूल्य अधिकार असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. २६ - निवडणूक कोणतीही असली तरी मतदानाचा अमूल्य अधिकार असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. भारतीय राज्य घटनेत प्रत्येक घटकाचा अत्यंत सुक्ष्म विचार केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानात अत्यंत सूत्रबध्दता असल्याने कुठलाही गोंधळ नसतो, कुठलीही संदिग्धता नसते असे सांगून त्यांनी सांगितले. 

तसेच घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. अधिकार उपभोगत असतानाच कर्तव्यात कसूर करु नये, असेही ते म्हणाले.  भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार लोकशाहीचा गाभा असून कुठलीही निवडणूक असो आपल्या या अमूल्य मताचा अधिकार बजावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसिना फरास, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजेस्वीनी सावंत, लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक ॲड्रेन मेहर, विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.                                                                                                                                 या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक एम.बी.तांबडे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पथक जाहिर झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.   यावेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

यामध्ये निर्भया पथकाचा चित्ररथ यावर्षीचे आर्कषण ठरला. यामध्ये मोबाईल फॉरेन्सीक इन्वीस्टीगेशन विभागाचे वाहन, महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचा चित्ररथ, दंगल नियंत्रण पथक वाहन, कॅशलेस इंडियाचा बँक ऑफ इंडियाचा चित्ररथ, आरोग्य, आपत्ती व धोके व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण व वन विभाग, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, एडस् नियंत्रण, केंद्रांच्या विविध योजना, शिक्षण विभागाचा ज्ञानरथ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, विविध शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा समावेश होता.  

विशेष गौरव
 महानगरपालिकेच्या नेहरु नगर प्राथमिक शाळातील मुलांनी माझे कोल्हापूर हे सादर केलेले समुह नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: जावून या चिमुकल्यांचे कौतुक केले. उषाराजे हायस्कुलच्या विद्यार्थींनी शेतकरी नृत्य सादर केले तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी, विद्यार्थींनीनी सारे जहांसे अच्छा आणि आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा ही समूहगीते सादर केली.