शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संबंधित डॉक्टरवर फौजदारी करण्याचे महापौरांचे आदेश ; ‘सावित्रीबाई फुले’त उपचारास दाखल करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:14 IST

बाळास काही झाल्यास जबाबदार नाही, त्यापेक्षा दुस-याच दवाखान्यात जावा, असा सल्ला दिला. यावर संबंधित डॉक्टरावर फौजदारी दाखल करण्यासाठी महापौर आजरेकर दोन तास रुग्णालयात थांबून होत्या.

: संबंधित डॉक्टरवर फौजदारी करण्याचे महापौरांचे आदेश ; ‘सावित्रीबाई फुले’त उपचारास दाखल करण्यास टाळाटाळ

कोल्हापूर : प्रसूतीसाठी येणाऱ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये घडत आहे. सोमवारी (दि. १३) रात्री पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला. महापौर निलोफर आजरेकर यांनी पाठविलेल्या रुग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. बाळास काही झाल्यास जबाबदार नाही, त्यापेक्षा दुस-याच दवाखान्यात जावा, असा सल्ला दिला. यावर संबंधित डॉक्टरावर फौजदारी दाखल करण्यासाठी महापौर आजरेकर दोन तास रुग्णालयात थांबून होत्या.

महापौर निलोफर आजरेकर यांनी एका रुग्णाला प्रसूतीसाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल होण्यासाठी पाठविले. मात्र, संबंधित डॉक्टरने दाखल करण्याऐवजी ‘आमच्याकडे काही सुविधा नाहीत. तुम्ही सीपीआरमध्ये किंवा खासगी रुग्णालयात दाखल व्हा. बाळाला काही झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,’ अशी भीती घातली.

यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. महापौर आजरेकर यांना याची माहिती लागताच त्या तत्काळ रुग्णालयात आल्या. संबंधित डॉक्टरांची त्यांनी तासभर खरडपट्टी केली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही दिली. डॉक्टरांचा रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठविण्यामागे नेमका काय उद्देश आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

डॉक्टरच रुग्णांना दुसºया दवाखान्यात जाण्याचे सांगत आहेत. सोमवारी अर्धा तास रुग्णाला ताटकळत ठेवले. संबंधित डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून रुग्ण उपचार घेत असल्याचे दाखवून नंतर पळून गेल्याचे सांगितले. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितावर फौजदारी करण्याचे आदेश दिले आहेत.निलोफर आजरेकर, महापौर------------------------------------------------------------------घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांना अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. योग्य त्या प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल आयुक्तांकडे दिला जाईल.- डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका------------------------------------- --------------------------------------------- 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल