शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात उमटणार महापुराचे प्रतिबिंब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:04 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ महापुराच्या संकटाची भीषणता, नदीचे अडवलेले ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ महापुराच्या संकटाची भीषणता, नदीचे अडवलेले पाणी, मानवी हस्तक्षेप, रेड झोनमधील बांधकामे, निसर्गाशी छेडछाड, आपत्ती व्यवस्थापन, कोल्हापूरकरांची माणुसकी या सगळ्या परिस्थितीचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसणार आहे. शहरातील मंडळांकडून हा उत्सव साधेपणाने करतानाच देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरण जागरूकतेचे अंजन घालण्यात येणार आहे.मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूरचा गणेशोत्सव पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक गल्ली, पेठांची देखाव्यांची स्वत:ची अशी ख्याती आहे. उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरीचे तांत्रिक देखावे, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कसबा बावड्यातील सजीव देखावे, लक्ष्मीपुरी म्हणजे विद्युत रोषणाई, काल्पनिक मंदिरे ही खासियत पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळते.यंदा मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराने थैमान घातल्याने मंडळांचेच काय, कोल्हापूरचेच आर्थिक, सामाजिक गणित विस्कटले. पुराची ही भीषणता प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर आता उत्सवातील देखाव्यांच्या निमित्ताने नागरिकांना अंतर्मुख करण्याची आणि आपल्या चुकांची जाणीव करून देण्याची सामाजिक जबाबदारीही मंडळे पार पाडणार आहेत. अवचितपीर तालीम मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करण्यात येणार आहे.तांत्रिक देखावेही महापुरावरचशाहूपुरी व राजारामपुरी हे परिसर तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील मंडळांकडूनही महापुराची भीषणता, रेड झोनमधील बांधकामे, नद्यांचा अडविलेला प्रवाह, अलमट्टीची आपत्ती या विषयांवर देखावे केले आहेत.पाण्याचे शाहूकालीन व्यवस्थापनजुना बुधवार पेठेतील क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ शाहूकालीन आपत्ती व्यवस्थापनाचा देखावा करणार आहे. त्या काळातील कोल्हापूरचा नकाशा, पाण्याचे नियोजन, घरांची रचना यांची माहिती देखाव्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.पूरग्रस्तांची घरे बांधणार बाप्पाडांगे गल्ली तरुण मंडळाकडूनही पूरस्थितीची भीषणता मांडण्यात येणार आहे. श्री गणेशाचीच मूर्ती देखाव्याच्या रूपात मांडली जाणार आहे. यात गणपती बाप्पा पूरग्रस्तांची पडलेली घरे बांधून देत आहेत, असा आशय राहणार आहे.