शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नळ योजनेस पुन्हा गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाºया कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस शिरढोण (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यापैकी एका गळतीची दुरुस्ती करण्यात आली असली तरी वारंवार गळती लागणाºया या योजनेच्या सडलेल्या दाबनलिकेची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.इचलकरंजीस पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून थेट नळाद्वारे पाणीपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाºया कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस शिरढोण (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यापैकी एका गळतीची दुरुस्ती करण्यात आली असली तरी वारंवार गळती लागणाºया या योजनेच्या सडलेल्या दाबनलिकेची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.इचलकरंजीस पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून थेट नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यापैकी पंचगंगा नदीतून २० टक्के व कृष्णा नदीतून ८० टक्के पाण्याचा पुरवठा होतो. पंचगंगा नदीवरील जॅकवेलवर असलेली पाणी उपसा यंत्रणा ३५ वर्षांपूर्वीची असून, तिची क्षमता कमी झाली आहे. तर कृष्णा योजना वीस वर्षांपूर्वीची असून, या योजनेतून शहरापर्यंत १९.६ किलोमीटर पाणी आणले जाते. या योजनेसाठी जमिनीखालून नळ घालण्यात आल्यामुळे जमिनीतील क्षार व शेतीला वापरात येणाºया रासायनिक खताची प्रक्रिया नळांवर झाल्यामुळे हे नळ सडले आहेत.त्यापैकी सहा किलोमीटर लांबीचे नळ यापूर्वी बदलण्यात आले असून, साधारणत: आणखीन सहा किलोमीटर लांबीचे नळ बदलण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांवरील जॅकवेलमध्ये असलेले पाणी उपसा करणारे पंप नव्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे १७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव नगराध्यक्षाअ‍ॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे दाखल केला होता. त्याचा आता पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे शहराला आवश्यक असलेल्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका युद्धपातळीवर बदलली जाईल.गळतीची दुरुस्ती आजकृष्णेच्या दाबनलिकेवर शिरढोण गावच्या हद्दीतील काटाप्पा मंदिराजवळ मोठी गळती असून, ही गळती दुरुस्ती करावयाची झाल्यास एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.म्हणून आज, बुधवारी गळतीची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.