शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापुरात रेडीरेकनरचे दर जैसे थे दरात कोणतीही वाढ नाही : बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:18 IST

कोल्हापूर : बांधकाम व्यवसायात असणारी मंदी विचारात घेता २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील खुली जागा, निवासी जागेच्या रेडीरेकनर दरात वाढ न करता ते ‘जैसे थे’ राहणार आहेत.

कोल्हापूर : बांधकाम व्यवसायात असणारी मंदी विचारात घेता २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील खुली जागा, निवासी जागेच्या रेडीरेकनर दरात वाढ न करता ते ‘जैसे थे’ राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी शनिवारी दिले. त्यामुळे कोल्हापुरातील रेडीरेकनरचे दरही गेल्यावर्षीप्रमाणेच राहणार आहेत. परिणामी, जमीन व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात आठ ते दहा टक्क्यांची वाढ करून ते १ एप्रिलपासून जाहीर केले जातात; पण यंदा संपूर्ण राज्यभरात बांधकाम व्यवसायात असलेल्या मंदीचा विचार करता तसेच ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे शासनाचे स्वप्न साकारण्यासाठी राज्यातील रेडीरेकनरचे दर गतवर्षीप्रमाणे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

क्रिडाई आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे रेडीरेकनर दराबाबत चर्चा केली होती. अनेक मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील फ्लॅट विक्रीविना पडूनच आहेत. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. याचा विचार करून नोंदणी महानिरीक्षकांनी हे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.रेडीरेकनरचे चौरस मीटरचे दर (ठिकाण, खुली जागा, निवासी दर रुपये)ताराबाई रोड ते वरुणतीर्थ वेश परिसर : २४३१०, ३८८००महाद्वार रोड ते खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर : ३८०८०, ४२०००बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी : ४२३८०, ४२२५०महाद्वार रोड, मेन रोड : ५१७००, ४९९५०गुजरी ते जोतिबा रोड : ५०६००, ५५२७०भेंडे गल्ली परिसर : ४८६८०, ५१०७०भाऊसिंगजी रोड ते भवानी मंडप : ५४०९०, ५६४७०व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक : ४१६९०, ४७४८०शाहूपुरी व्यापार पेठ परिसर : ३५७२०, ४७०२०दाभोळकर चौक ते महादेव मंदिर, ताराराणी चौक परिसर : ४८३८०, ५२३५०राजारामपुरी मेन रोड : ४४१९०, ४७९४०रुईकर कॉलनी परिसर : १९२५०, ४२५००हिंमतबहाद्दूर परिसर, सरलष्कर पार्क : १८८५०, ४३९८०प्रतिभानगर, शास्त्रीनगर परिसर : १०३४०, ३९६५०खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज परिसर : २०५००, ४४६००साकोली कॉर्नर ते रंकाळा : १६०१०, ३८२००फिरंगाई परिसर (शिवाजी पेठ) : १३२००, ३६११०बेलबाग परिसर : ८७२०, ३१३५०शाहू व शिवाजी स्टेडियम परिसर : १०४७०, ३१३८०गोखले महाविद्यालय परिसर : १३९६०, ३३६९०बिंदू चौक, मिरजकर तिकटी परिसर : ३४२३०,३६२९०सुभाषनगर परिसर : ५७५०, ३१३००बाबा जरगनगर मेन रोड : ५०१०, ३००३०असेंब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय : २५७४०, ४६४६०माळी कॉलनी, टाकाळा परिसर : १४०५०, ३९९००शिवाजी पार्क परिसर : २२९९०, ४२६२०मार्केट यार्ड, जाधववाडी परिसर :७८३०, ३७६४०रेडीरेकनरचे दर वाढले की त्या प्रमाणात स्टॅम्प ड्यूटी, महापालिका चार्जेस, इन्कम टॅक्समध्ये आपोआपच वाढ होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले असल्याचा विचार करून पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी गृहदालन प्रदर्शनामध्ये रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’चे दिलेले आश्वासन पाळले. दर कायम राहण्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.- महेश यादव,अध्यक्ष, क्रिड ई कोल्हापूर