शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

रेडीरेकनर दरात सरासरी ७.३० टक्के दरवाढ

By admin | Updated: April 2, 2017 00:53 IST

घरे महागणार; अपरिहार्य नैसर्गिक दरवाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रेडीरेकनरच्या दरात सरासरी ७.३० टक्के वाढ झाली आहे. राज्य सरकारने राज्यातील विविध शहरांतील रेडीरेकनरचे दर शनिवारी जाहीर केले. नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रांत मंदी आली होती. आता रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात १० टक्के, प्रभावक्षेत्रात ११.६३ टक्के, नगरपालिका क्षेत्रात ५.५० टक्के, तर महानगरपालिका क्षेत्रात ३ टक्के अशी रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या दरवाढीबाबत दिवसभर संभ्रमावस्था होती. आधीच्या माहितीनुसार १० ते १५ टक्के वाढ झाली असे सांगण्यात येत होते; परंतु अधिकृत माहिती कोणाकडूनही मिळत नव्हती. बांधकाम व्यावसायिक दिवसभर आॅनलाईनवर माहिती मिळते का, याची प्रतीक्षा करीत होते. रात्री उशिरा याबाबत अनधिकृतपणे माहिती उपलब्ध झाली. नोटाबंदीमुळे आधीच सर्व क्षेत्रांवर मंदीचे सावट असताना आता नव्याने रेडीरेकनरचे दर वाढवून नव्या अडचणी वाढवू नका, अशी मागणी ‘क्रिडाई’च्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे या वर्षी वाढ होणार नाही, अशी अपेक्षा होती; परंतु राज्य सरकारला नोटाबंदीमुळे तीन हजार कोटींवर कमी महसूल मिळाला. त्यामुळे नैसर्गिक वाढ करणे अपरिहार्य होते.रेडीरेकनरच्या दरवाढीचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. आयकर मूल्यांकन, महापालिका प्रीमियम, जमिनीची नजराणा फी, स्टॅँप ड्यूटी यांच्यावर परिणाम होणार असल्याने बांधकामाच्या किमती वाढणार आहेत. - राजीव परीख, क्रिडाई, राज्य उपाध्यक्ष * शहरातील नवीन रेडीरेकनरचे दर पुढीलप्रमाणे ——————————————————— परिसर खुली जागा सदनिका कार्यालये दुकाने——————————————————————————————————————-* पद्माराजे गर्ल्स परिसर २१७१० ३३२१० ३६१८० ६८०२०* महाद्वार रोड ३८०८० ४२००० ५६०३० ११७४८०* गुजरी ५०६०० ५५२७० ६३५६० १३१०१०* शिवाजी रोड - बिंदू चौक ५१५९० ५५४५० ६३१०० १११५२०* गंगावेश ४९४१० ५२५०० ५६९४० ९३२९०* रेल्वे फाटक २६२९० ४५८४० ५३७६० ११४४९० * बागल चौक २३७१० ४६४६० ५३७६० ८८९३०* शाहूपुरी १९४२० ४२०३० ४४८१० ५३४९०* ताराबाई पार्क ३०८०० ५१००० ५५१४० ६९८९०—————————————————————————————————————————-(सूचना : वरील दर प्रतिचौरस मीटर आहेत.)