शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मॅँचेस्टरच्या खाऊगल्लीत कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्याची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:07 IST

कोल्हापूरचे प्रदीप नाळे आणि बोरिवलीचे देवांग घोईल या दोघांनी मॅँचेस्टरमधील करिमाईल (या भागात सर्व हॉटेल्स आहेत) परिसरामध्ये आपल्या ‘झिया रेस्टॉरंट’मधून अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांचे वाढप करीत इंग्लंडवाल्यांनाही वेड लावले आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने हे हॉटेलही चर्चेत आले आहे.

ठळक मुद्देमॅँचेस्टरच्या खाऊगल्लीत कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्याची धूममहाराष्ट्रीय प्रदीप, देवांगच्या ‘झिया’ रेस्टॉरंटने लावले वेड

समीर देशपांडेकोल्हापूर : इंग्लंडमधील मॅँचेस्टरमध्ये तुम्ही जर गेलात आणि तुम्हांला ‘कोल्हापूरचा तांबडा-पांढरा’ प्यायची इच्छा झाली किंवा कोथिंबिरीची वडी खायची इच्छा झाली तर काळजी करू नका. कोल्हापूरचे प्रदीप नाळे आणि बोरिवलीचे देवांग घोईल हे दोघेजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. मॅँचेस्टरमधील करिमाईल (या भागात सर्व हॉटेल्स आहेत) परिसरामध्ये आपल्या ‘झिया रेस्टॉरंट’मधून अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांचे वाढप करीत या दोघांनी इंग्लंडवाल्यांनाही वेड लावले आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने हे हॉटेलही चर्चेत आले आहे.

कोल्हापूरच्या टेंबे रोडवर राहणारे प्रदीप यांनी आपले कॉमर्सचे शिक्षण घेतानाच येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला सुरुवात केली; परंतु करिअर करायचे ठरवून त्यांनी पुण्यातून शासकीय महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंगची पदवी संपादन केली. १९९३ नंतर ते नैरोबीला गेले. तेथे सहा वर्षांचा अनुभव घेऊन कोल्हापुरात आले. तीन वर्षे हॉटेल आणि एक कॅँटीन चालविले; पण ते अस्वस्थ होते. काहीतरी नवीन करायचं होतं. वाट सापडत नव्हती. २००३ मध्ये दुबईला गेले. तिथे पाच वर्षे एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून काम केल्यानंतर त्यांची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यांना इंग्लंड खुणावत होते. ७ नोव्हेंबर २००७ रोजी ते इंग्लंडला गेले. दुबईतच त्यांची ओळख बोरिवलीच्या देवांग घोईल याच्याशी झाली. दोघांनाही एकमेकांची कामाची पद्धत पटली आणि त्यांनी मॅँचेस्टरमधील एका ब्रिटिशाचे रेस्टॉरंट चालवायला घेतले. त्या ठिकाणी पाकिस्तानी, बंगाली अनेकजण असे आहेत की, जे आपल्या हॉटेलच्या बोर्डवर ‘इंडियन फूड’ असे लिहून व्यवसाय करतात; परंतु तेथे कुणाच भारतीयाचे हॉटेल नाही.

या दोघांनी चिकाटीने व्यवसाय करीत पाच वर्षांनंतर हे हॉटेलच विकत घेतले. आज अस्सल भारतीय, महाराष्ट्रीय आणि कोल्हापुरी चवीसाठी ‘झिया’प्रसिद्ध आहे. मॅँचेस्टरच्या आसपास राहणारे अनेकजण सातत्याने महाराष्ट्रीय पदार्थ खाण्यासाठी या रेस्टॉरंटवर येतात. इंग्लंडमध्ये बॉम्बे वडे मिळतात; परंतु अस्सल कोल्हापुरी वडा, सोबतीला तळलेल्या मिरच्या, मिसळ हे सगळं ‘झिया’मध्ये मिळतं.

मी सुरुवातीला कोल्हापुरी मसाले वापरून पदार्थ करीत होतो; परंतु सातत्याने असे मसाले आणणे शक्य होत नाही. त्यामुळे आता येथेच त्या पद्धतीचे मसाले तयार करतो. दोनच दिवसांपूर्वी सुनील गावसकर येथे जेवून गेले; तर पुढच्या आठवड्यात अभिनेता अतुल कुलकर्णी येणार आहे. कोल्हापुरात आल्यानंतर अजूनही मी छोट्या गाड्यांवर आणि छोट्या हॉटेल्समध्ये जातो आणि पुन्हा फ्र्रेश होतो.- प्रदीप नाळेमॅँचेस्टर

 

टॅग्स :foodअन्नkolhapurकोल्हापूर