शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गुरुवारपासून भरती, ‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 11:06 IST

गोव्यासह महाराष्ट्रातील  सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसैन्यभरतीस येणाऱ्या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्रकोल्हापुरात गुरुवारपासून भरती, अशोक रोकडे यांची माहिती १३ वषात ४.५ लाख तरुणांना लाभ

कोल्हापूर : गोव्यासह महाराष्ट्रातील  सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तेरा वर्षांत विविध जिल्ह्यांतील ४.५ लाख तरुणांना या अन्नछत्राचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.रोकडे म्हणाले, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे २००५ ला सैन्यभरतीला मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. त्यावेळी त्या तरुणांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. भरतीसाठी सामान्य कुटुंबांतील मुले देशसेवेचे मोठे स्वप्न घेऊन भरतीसाठी आलेली असतात.

खाण्यापिण्याची सोय नसल्याने त्यांना बिस्किटे, पाणी पिऊन दिवस काढावे लागले. या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’ने सैनिक कार्यालयात अन्नछत्राची संकल्पना मांडली. तिला तत्काळ मंजुरी मिळाली. सैन्यभरतीवेळी अन्नछत्राची सुरुवात भारतात पहिल्यांदाच कोल्हापुरातून झाली.

आतापर्यंत सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा अशा सैन्यभरतीच्या ठिकाणी जाऊन मोफत अन्नछत्र उभे करून भावी सैनिकांना आम्ही मानसिक बळ देण्याचे काम केले.

या अन्नछत्राची दखल भारतीय वायुसेनेने घेतली असून गोवा, जळगाव सैन्यभरतीवेळी वायुसेनेलाही मदत करण्यात आली. भारतीय स्थलसेना भरती, भारतीय वायुसेना भरती, १०९ टी ए मराठा भरती, माजी सैनिक हरित सेना भरती, एसआरपीएफ पोलीस भरती अशा अनेक भरतीच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षांत सुमारे साडेचार लाख तरुणांना लाभ झाल्याचे रोकडे यांनी सांगितले.अन्नछत्र चालविण्याची सर्व जबाबदारी ‘व्हाईट आर्मी’चे जवान स्वत: करतात. या उपक्रमात जवान जेवण बनवितात, शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे वाटपही केले जाते. सैन्यदलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाºयांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसाही केली आहे.

यासाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती मदत करतात. गुरुवारपासून १६ डिसेंबरपर्यंत गोवा व सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तरुणांची सैन्यभरती शिवाजी विद्यापीठ येथे सुरू होत आहे. तिथे अन्नछत्राची सोय केल्याचे रोकडे यांनी सांगितले. यावेळी सचिन भोसले, प्रशांत शेंडे, शैलेश रावण, विष्णू कुंभार, देवराज सहानी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर