शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

घरफाळ्याचे पावणे तीन कोटी वसूल

By admin | Updated: November 12, 2016 00:53 IST

सुविधा केंद्रांवर गर्दी : पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारल्या

कोल्हापूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टी वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा भरून घेतल्या. त्यासाठी पाचही नागरी सुविधा केंद्रांत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ एका दिवसात २ कोटी ८६ लाख वसुली झाल्याचे सांगण्यात आले. ५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यामुळे बुधवार व गुरुवार (दि. ९ व १०) पासून महानगरपालिकेने या नोटा स्वीकारण्याचे नाकारले. घरफाळा, पाणीपट्टी, परवाना शुल्क, दुकानगाळ्यांचे भाडे अशा स्वरूपाची कोणतीही रक्कम महानगरपालिकेने स्वीकारली नाही. त्यामुळे या दोन दिवसांत केवळ आठ ते दहा लाखांची वसुली झाली. याचा दोन दिवसांत मोठा फटका बसला; परंतु गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारचे एक परिपत्रक प्रशासनाला मिळाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टीच्या वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, अशा सूचना या परिपत्रकानुसार मिळाल्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील महापालिका मुख्य कार्यालय, शिवाजी मार्केट, गांधी मैदान, बागल मार्केट, ताराराणी चौक या पाचही नागरी सुविधा केंद्रांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वच सुविधा केंद्रांत दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळनंतर ही गर्दी कमी-कमी होत गेली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल २ कोटी ४६लाख ४३ हजार ३११ रुपयांची वसुली झाल्याचे लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, ही सुविधा आणखी ७२ तासांनी वाढविल्याची अफवा पसरली होती; परंतु आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य सरकारकडे याबाबत चौकशी केली असता असा कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री बारा वाजता ही सुविधा १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)३० डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवा : आजरेकर राज्य सरकारने जुन्या नोटा भरून घेण्यास महानगरपालिके ला ३० डिसेंबरपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी शुक्रवारी केली. महानगरपालिका हा सरकारचाच एक भाग आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बॅँकेच्या दारात मोठ्या रांगेत उभे राहून नोटा बदलणे आणि पुन्हा त्या महापालिके त कराच्या स्वरूपात भरणे अधिक त्रासाचे होणार आहे. त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे नागरिकांचा त्रासही कमी होईल आणि महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढेल, असे आजरेकर यांनी म्हटले आहे.