शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

विक्रमी ९०६ अर्ज

By admin | Updated: June 9, 2015 00:58 IST

बाजार समिती निवडणूक : उद्या छाननी; शनिवारपर्यंत माघारीची मुदत

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी विविध गटांतून २०२ अर्ज दाखल झाले असून, अर्ज भरण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. आतापर्यंत तब्बल ९०६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये जिल्हा बॅँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, माजी सभापती दिनकर कोतेकर, आदी दिग्गजांचा समावेश आहे. उद्या, बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे. बाजार समितीच्या १९ जागांसाठी ९०६ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल २५८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ विकास सेवा संस्थांतील सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी ३८४ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वांत कमी भटक्या-विमुक्त जाती/जमाती गटातील एका जागेसाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत माघारीची मुदत आहे. या दिग्गजांनी सोमवारी दाखल केले अर्ज - मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, ‘बिद्री’चे संचालक पंडितराव केणे, माजी संचालक दत्तात्रय उगले, दिनकर कोतेकर, पंडितराव बोंद्रे, अनिल साळोखे, शिवाजी ढेंगे, प्रदीप पाटील, शाहू काटकर, पृथ्वीराज सरनोबत, उमरसाहेब पाटील, दत्ताजीराव वारके, कृष्णात चव्हाण, प्रा. जालंदर पाटील, केरबा चौगुले, सर्जेराव पाटील (कळे), एच. आर. जाधव (बहिरेवाडी).असे झालेत अर्ज दाखल, कंसात जागा : विकास संस्था : सर्वसाधारण गट ३८४ (७), महिला ३८ (२), इतर मागासवर्गीय- ७१ (१), भटक्या विमुक्त जाती/जमाती १५ (१). ग्रामपंचायत : सर्वसाधारण- २५८ (२), अनुसूचित जाती/जमाती ३३ (१), आर्थिक दुर्बल २२ (१). व्यापारी, अडते : ३० (२), हमाल-तोलाईदार - ३६ (१), कृषी प्रक्रिया संस्था १९ (१).मागील निवडणुकीची पुनरावृत्ती?मागील निवडणुकीत विभाजनाच्या राजकारणातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. विविध गटांतून एक हजारजण रिंगणात होते. यावेळी ९०६ अर्ज दाखल झाल्याने मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का? झाली तर कशी यंत्रणा लावायची, याची निवडणूक यंत्रणेकडून चाचपणी सुरू आहे.दृष्टिक्षेपात बाजार समिती निवडणूकपात्र विकास संस्था१,१४३ (मतदार - १३,८९६) ग्रामपंचायती६०२(मतदार- ५,२२८)अडते-व्यापारी गट१,०६३हमाल-तोलाईदार८९३प्रक्रिया संस्था६३संस्था (७८२)जागा १९सध्या कोणाची सत्ता प्रशासकअर्जांची छाननी१० जूनमाघारीची मुदत१३ जूनमतदान१२ जुलै.मतमोजणी१४ जुलै