शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

धर्म-राजसत्तेचा मिलाप करणारा शाही दसरा उत्साहात; भव्य दिव्य साेहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 5, 2022 21:29 IST

कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पाेहोचवण्यासाठी राज्य शासनाने या साेहळ्याला राज्य महाेत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधिही झाला नाहीअसा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला.

कोल्हापूर : आदिशक्ती जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्थान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नूषा करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणीनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा बुधवारी मावळतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. काेल्हापुरला लाभलेली धर्मसत्ता, दैवसत्ता आणि राजसत्तेचा मिलाप असलेल्या या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने यंदा उंट, घोड्यांचा सहभाग, नगारे, ढोल ताशांचा गजर, पायलेटींग पोलीसांचे संचलन,  एकीकडे पालख्यांची मिरवणूक दुसरीकडून शाहू छत्रपती यांचे मेबॅक वाहनातून आगमन, देवीची आरती आणि शमी पूजन, बंदुकाच्या फैरी झाडून सलामी, आसमंतात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी असा नेत्रदीपक सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात पार पडला. 

कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पाेहोचवण्यासाठी राज्य शासनाने या साेहळ्याला राज्य महाेत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधिही झाला नाहीअसा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला. सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन झाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,  माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, संजय डी. पाटील,  आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. डी. टी. शिर्के, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह छत्रपती घराण्याशी संबंधित सरदार घराण्यांचे मानकरी उपस्थित होते. 

सायंकाळी पावणे पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान झाले. यावेळी पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पाठोपाठ तुळजाभवानी आणि गुरुमहाराजांची पालखी होती. सहा वाजता शाहू छत्रपतींचे आगमन झाले. येथे संस्थानकालीन गीत वाजवल्यानंतर त्यांच्या हस्ते शमी पूजन झाले. देवीची आरती झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. त्यानंत्यानंतर कोल्हापुरकरांनी सोने लुटले. नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारत शाहू छत्रपती जूना राजवाड्याकडे गेले. अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरमार्गे पंचगंगा नदी घाटावर गेली. तेथून रात्री पालखी मंदिरात परतली.संस्थानकालीन उत्सवाचा अनुभव 

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा शाही दसरा सोहळा निर्बंधमुक्त आणि भव्यदिव्य प्रमाणात साजरा झाला. संस्थानकालीन सोहळ्याच्या अनुभव देणाऱ्या या उत्सवात अंबाबाईच्या भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. दुसरीकडे न्यू पॅलेसमधून शाहू छत्रपतींचा लवाजमा निघाला, उंट, घोडेस्वार, छत्रपतींच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कलाकार, ढोल, ताशे, नगारे, लेझीम व झांज पथक, पोलीस बँन्ड अशा रंगारंग साेहळ्यांनी कोल्हापूर दूमदूमून गेले. लाखो नागरिकांनी हा सोहळा प्रत्यक्ष, टिव्हीवरील थेट प्रक्षेपण आणि शहरात ठिकठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनद्वारे पाहिला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर