शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचा निर्णय ही राजकीय आत्महत्या; शिवसेनेची टीका

By भीमगोंड देसाई | Updated: July 20, 2022 14:29 IST

कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती विकासनिधीपेक्षा स्वाभिमानाला जास्त जपते.

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय राजकीय आत्महत्या असल्याची टीका पक्षाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकार परिषदेत केली. मतदार त्यांना धडा शिकवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी म्हणाले, खासदार मंडलिक, माने हे शिवसेनेमुळे खासदार झाले. त्यांना खासदार करण्यात शिवसैनिकांचा वाटा मोठा आहे. मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेताना सामान्य, कडवट शिवसैनिकांना विचारले नाही. केवळ आपल्या गटाचा मेळावा घेऊन निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयाचा शहर शिवसेनेतर्फे आम्ही निषेध करतो.ते शिंदे गटामध्ये गेल्यानंतर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी विकास निधीसाठी आणि तेरा, चौदा खासदार जात आहेत, मी एकटा थांबून काय करू ? असा प्रतिप्रश्न विचारला. मंडलिक यांचा निर्णय सामान्य शिवसैनिकांच्या पचनी पडलेला नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती विकासनिधीपेक्षा स्वाभिमानाला जास्त जपते. याचे प्रत्यंतर त्यांना निवडणुकीत नक्कीच येईल.

अहो...मी तुमच्यासोबतच..

खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती देण्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी मंडलिक यांना थांबण्याचा सल्ला दिला नाही. मंडलिक यांनी आपला निर्णय सांगितला व जिल्ह्याच्या राजकारणात मी तुमच्यासोबत असेन, असा ‘शब्द’ त्यांनी मुश्रीफ व सतेज पाटील यांना दिल्याची माहिती मोदी यांनी दिली..

वडिलांकडून संघर्षाचा आदर्श घ्यावादिवंगत ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांनी कठीण प्रसंगात स्वाभिमानाच्या जीवावर वेगवेगळी चिन्हे घेऊन लढून विजय मिळविला. वडिलांच्या या संघर्षाचा संजय मंडलिक यांनी आदर्श घ्यायला पाहिजे होता, असे शिवसेना शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी सांगितले.

आमिषे दाखवली जात आहेत

शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांना शिंदे गटाकडे खेचण्यासाठी विविध आमिषे दाखविली जात आहेत पण याला येथील पदाधिकारी बळी पडणार नाहीत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

रेल्वे बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामाखासदार मंडलिक यांनी आपल्या कोट्यातून पुणे रेल्वे बोर्डावर सदस्य म्हणून सुनील मोदी यांची निवड केली होती पण मंडलिक शिंदे गटात गेल्याच्या निषेधार्थ मोदी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याची माहिती मोदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण