शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

ग्रामीण भागात वसतिगृहांची खरी गरज

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

ज्ञानेश्वर मुळे : मुळे अकादमीचा पहिला वर्धापनदिन उत्साहात

उत्तूर : सर्व शिक्षा अभियानामुळे सर्वांना शिक्षण मिळालेच आहे असे नाही. आजही ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यात शिक्षण घेण्यापासून वंचित घटक आहे. त्यामुळे अशा दुर्लक्षित भागात वसतिगृहांची उभारणी केल्यास गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील ज्ञानेश्वर मुळे अकादमीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन मुळे यांच्याहस्ते झाले. अकादमीतर्फे माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, वसंतराव धुरे, सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, देशभूषण माने, रुक्मिणी कोळेकर, प्रा. रजनी भागवत, शिवलिंग सन्ने, अनंतराव आजगावकर आदींचा सत्कार करण्यात आला.मुळे म्हणाले, मी जरी अमेरिकेत राहत असलो तरी माझे खरे प्रेम मातृभूमीत आहे. अमेरिकेत शिक्षणापासून कुणालाही वंचित ठेवले जात नाही. ही व्यवस्था अमेरिका सरकारने तयार केली आहे. भारतात अमेरिकेप्रमाणे व्यवस्था रूजवण्याची गरज आहे. खेड्यातील मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त होवू शकत नाही. यासाठी उत्तूर येथे आनंद मोरे यांनी सुरू केलेल्या राजर्षी शाहू वसतिगृहाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याचा लाभ घेवून वसतिगृहासाठी मदतीची अपेक्षाही मुळे यांनी व्यक्त केली.यावेळी स्वाती अस्वले, पुंडलिक परीट, प्रा. रजनी भागवत, अशोक भोईटे यांची भाषणे झाली. अकादमीतर्फे सतीश नागरपोळे, समृद्धी कांबळे, पुंडलिक परीट या गुणवंतांचा सत्कार झाला. कार्यक्रमास डॉ. प्रकाश तौकरी, निर्मला व्हनबट्टे, धनाजी जाधव, भैरू निऊंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आनंद मोरे यांनी सूत्रसंचलन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)५० हजार निधी संकलनज्ञानेश्वर मुळे यांनी उत्तूर येथील वसतिगृहाचे भाडे द्यावयाचे आहे. वसतिगृहाला सढळ हाताने मदत करावी, असे व्यासपीठावरून आवाहन केले. यावेळी ५० हजारापेक्षा जादा निधीची घोषणा उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी उभे राहून केली.स्वागताची जय्यत तयारीउत्तूर विद्यालय, उत्तूर येथील कार्यक्रमस्थळी झांजपथकाने मुळे यांचे स्वागत केले. परिसरातून आलेल्या शाळातील विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी केली होती. भव्य असा मंडप उभारला होता.