गडहिंग्लज : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.गडहिंग्लज पंचायत समितीच्या नूतन उपसभापती इंदू नाईक यांनी संध्यादेवींच्याहस्ते फित कापून आपल्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती रूपाली कांबळे, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.संध्यादेवी म्हणाल्या, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के जागा मिळाल्या. यातूनच बेरड रामोशी या उपेक्षित समाजातील इंदूतार्इंना उपसभापतीपदाचा बहुमान मिळाला याचा मनस्वी आनंद झाला. यावेळी विजयराव पाटील, इराप्पा हसुरी, विद्याधर गुरबे, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, उत्तम नाईक आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहचवा : संध्यादेवी कुपेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:47 IST
PanchyatSamiti Gadhingalj Kolhapur : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.
शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहचवा : संध्यादेवी कुपेकर
ठळक मुद्देशासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहचवा : संध्यादेवी कुपेकरगडहिंग्लजच्या उपसभापती इंदू नाईक यांचा दालन प्रवेश