शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:53 IST

कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ...

ठळक मुद्देविके्रते महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून बिंदू चौक सबजेल परिसरात कारवाईवेळी तणाव

कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध केल्याने झटापट झाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही यावेळी घडला. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विक्रेत्यांना बाजूला हटविले. त्यानंतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.कोल्हापूर महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने अतिक्रमणांवर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी बिंदू चौक येथे अतिक्रमण कारवाईवेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला. शनिवारीही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता सीपीआर चौक येथून कारवाईला सुरुवात झाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले.महापालिका, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आले. फेरीवाले व दुकानदारांनी कारवाईला विरोध केल्याने भवानी मंडप ते बिंदू चौक येथे तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे राजू माने, रवी कांबळे, शरद कांबळे, माधव निगवेकर, प्रदीप तवंदकर, उदय तावडे, विक्रम कांबळे, लखन कांबळे कारवाईच्या मोहिमेत सहभागी होते.महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीबिंदू चौक सबजेल परिसरात महालक्ष्मी टॉईज या दुकानातील व्यावसायिकाने दारातच खाट टाकून वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. महापालिकेतील कर्मचारी येथील साहित्य जप्त करताना मालकाने विरोध केला. यावेळी कर्मचाºयांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. कर्मचारी आणि मालकांच्यात झटापट झाली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुकानदारासा बाजूला केल्यानंतर साहित्य जप्त करण्यात आले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर