लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी पुन्हा लवाद समिती स्थापन करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी यंत्रमागधारक असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
निवेदनात, इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात खर्चीवाला यंत्रमागधारक अत्यंत कमी मजुरीमध्ये काम करत आहेत. ते न परवडणारे असल्याने अनेक कारखानदारांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, हे कोठे तरी थांबावे. सन २०१७ साली शहरात प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या लवाद समितीद्वारे ०.०६ पैसे मजुरी ठरवली होती. तीही आजतागायत यंत्रमागधारकांच्या पदरी पडली नाही.
दरम्यान, लवाद समिती बरखास्त झाल्यामुळे यंत्रमागधारकांनी कोणाकडे दाद मागावी, असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. तरी पुन्हा लवाद समिती स्थापन करून साध्या यंत्रमागधारकांना न्याय मिळावा, असे म्हटले. शिष्टमंडळात विकास चौगले, राजू उरणे, जनार्दन चौगले, दीपक अथणे, सतीश मगदूम, गोपाळ उरणे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
३००३२०२१-आयसीएच-०३
यंत्रमाग व्यवसायाकरिता पुन्हा लवाद समिती स्थापन करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी यंत्रमागधारक असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
छाया-उत्तम पाटील