शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

कोरोना वर्षातही रवळनाथच्या ठेवीत ५५ कोटींनी वाढ : एम. एल. चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:00 IST

Banking Sector Gadhinglaj Kolhapur- गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेत ३११ कोटींच्या ठेवी आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या वर्षातदेखील संस्थेची कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्तम राहिली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोना वर्षातही रवळनाथच्या ठेवीत ५५ कोटींनी वाढ : एम. एल. चौगुलेकोरोना वर्षातही उत्तम कामगिरी कायम

गडहिंग्लज : गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेत ३११ कोटींच्या ठेवी आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या वर्षातदेखील संस्थेची कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्तम राहिली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.चौगुले म्हणाले, ३१ मार्चअखेर संस्थेची सभासद संख्या ८०६३ आहे. एकूण ठेवी ३११ कोटी तर २१९ कोटीची कर्जे आहेत. खेळते भांडवल ३४६ कोटीचे असून एकूण गुंतवणूक १११ कोटीची आहे. ५३० कोटीचा वार्षिक व्यवसाय तर १ कोटी ४० लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. गडहिंग्लजमध्ये संस्थेची स्व:मालकीची प्रधान कार्यालय इमारत असून ९ पैकी गडहिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर कुडाळ या शाखा स्व:मालकीच्या इमारतीत आहेत. गेल्यावर्षी ठेवी संकलन व कर्ज वितरणात बेळगाव शाखेने आघाडी मारली आहे.संस्थेची वेबसाईट असून त्यावर वार्षिक अहवालासह ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते. सध्या एसएमएस बँकींग, सीबीएस, मायक्रो एटीएम, डेबीट कार्ड व नॅशनल अ‍ॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा उपलब्ध आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी उपाध्यक्ष वासुदेव मायदेव, सीईओ दत्तात्रय मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, सर्व संचालक, शाखाध्यक्ष, सल्लागार, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असेही चौगुले यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांना दोन वेतन वाढीकोरोनामुळे संस्था आर्थिक अडचणीत येवू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षात २० टक्के महागाई भत्ता आणि वेतनवाढ स्वेच्छेने नाकारला होता. परंतु, त्यांच्याच कष्टामुळे संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राहिल्यामुळे यावर्षी त्यांना दोन वेतनवाढी आणि २० टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे चौगुले यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर