शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

ताराराणी आघाडीचे रत्नश शिरोळकर २०० मताने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 10:44 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले.

ठळक मुद्दे शिरोळकर यांना १३९९, तर राजेश लाटकर यांना ११९९ मते आघाडीची आकडेवारी जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष

कोल्हापूर, १२ : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना १३९९ तर लाटकर यांना ११९९ मते पडली. शिवसेना उमेदवार राज जाधव यांना अवघी ८० मते पडली. गुरुवारी सकाळी निकाल जाहीर झाला.जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह तीन आमदार, महापौर, उपमहापौरांसह सर्व नगरसेवकांचा सहभाग असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी केवळ ५८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकमेकांना राजकीय शह देण्याच्या हेतूने नेत्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला खरा, परंतु मतदारांनी मात्र मतदान प्रक्रियेत निरूत्साह दाखविल्याने मतदानानंतर विजयी कोण होणार याबाबत कमालीची उत्कंठा लागून राहिली होती.माजी नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे पोटनिवडणूक झाली. राज बाबूभाई जाधव (शिवसेना), रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी), पवन पांडुरंग माळी व राजेश भरत लाटकर (दोघेही अपक्ष) यांनी ही निवडणूक लढविली. या निवडणुकीत राजेश लाटकर हे राष्टÑवादीचे कार्यकर्ते तसेच शहर अध्यक्ष असूनही त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविली.निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन प्रभागात २० हून अधिक बैठका घेऊन प्रचार केला होता. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही प्रत्यक्ष प्रचारात घेऊन निवडणुकीची यंत्रणा गतिमान केली. बुधवारीही सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळाने हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी दिवसभरातील बराच वेळ मतदान केंद्राबाहेर थांबून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तसेच मतदारांना विनंती केली.ताराबाई पार्कमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय (बैलगोठा) तसेच सासने विद्यालय येथे प्रत्येक दोन-दोन मतदान केंद्रांवर राजेश लाटकर यांच्यासाठी आ. मुश्रीफ, आ. पाटील यांच्यास महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, सभागृह नेते प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, प्रा.जयंत पाटील यांच्यासह कॉँग्रेस राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक तर ताराराणी आघाडीच्या रत्नेश शिरोळकर यांच्यासाठी आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता किरण शिराळे,नगरसेवक सुनील कदम यांच्यासह ताराराणी व भाजपचे सर्व नगरसेवक मतदान केंद्रांवर उपस्थित होते.

बुधवारी मतदान संपताना ४८९८ पैकी २८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यावसायिक, नोकरदार, उच्चशिक्षित मतदार असलेल्या या मतदारसंघातील सुमारे ४७० मतदार स्थलांतर झाले असून मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले.बैलगोठा मतदान केंद्रावर वादावादीदिवसभर चुरशीने पण शांततेत मतदान सुरू होते; परंतु बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (बैलगोठा) मतदान केंद्रावर झालेल्या किरकोळ वादामुळे काहीसे गालबोट लागले. या मतदान केंद्रावर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीला आमदार सतेज पाटील यांनी हरकत घेतली तसेच त्यांना १०० मीटर अंतराबाहेर काढा, असा आग्रह पोलीस अधिकारी देशमुख यांच्याकडे धरला. त्यावेळी कदम यांनी त्यांच्याकडील मतदान प्रतिनिधीचे ओळखपत्र पोलिसांना दाखविले. त्यानंतर कदम यांनी सतेज पाटील यांना बाहेर घालवा, असा आग्रह पोलिसांकडे धरला; पण पोलीस काहीच करत नाहीत म्हटल्यावर कदम यांनी त्यांच्या आघाडीच्या सर्व नगरसेवकांना केंद्राच्या आत बोलाविले. त्यानंतर पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह सर्वांनाच बाहेर जाण्यास सांगितले.झालेले मतदान -- पुरुष - १५१३- महिला- १३११- एकूण - २८२४- टक्केवारी - ५७.६६केंद्रनिहाय मतदानक्रमांक पुरुष महिला एकूण११/१ ४४२ ३२८ ७७०११/२ ३२६ २८९ ६१५११/३ ३८२ ३५४ ७३६११/४ ३६३ ३४० ७०३