शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

आकर्षक क्रमांकांतून ‘आरटीओ’ला साडेदहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:41 IST

कोल्हापूर : बाजारात नवीन वाहन, कोणत्याही कंपनीचे अथवा लाखो ते कोट्यवधी किमतीचे येऊ दे; ते कोल्हापूर, सांगली, सातारा या ...

कोल्हापूर : बाजारात नवीन वाहन, कोणत्याही कंपनीचे अथवा लाखो ते कोट्यवधी किमतीचे येऊ दे; ते कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांतील रस्त्यांवर हमखास दिसणारच, ही जशी खासियत या जिल्ह्यांची आहे, तशीच आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये मोजणारेही याच शहरांतून पाहण्यास मिळतील. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आकर्षक वाहन क्रमांकापोटी यंदा कोल्हापूर प्रादेशिक परिवहनकडून सुमारे साडेदहा कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.वाहन अगदी हजारातील असो अथवा लाखातील; त्याला क्रमांक मात्र आपल्या आवडीचा आकर्षक असाच हवा, असा अट्टहास कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांतील वाहनप्रेमींतून केला जातो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपये केवळ या आकर्षक क्रमांकापोटी जमा होत आहेत.यंदा कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कºहाड या चार उपप्रादेशिक कार्यालयांकडून १५ हजार ४३१ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकांपोटी तब्बल १० कोटी ५४ लाख १६ हजारांचा महसूल जमा केला आहे. यात विशेष म्हणजे १, ७, ९, ११, १५, ११११, ३३३३, ९९९१, ५७५७, ९९९९, १२३४, असे एक ना अनेक क्रमांक एकाच वेळी अनेकांना हवे असतात. अशा वेळी त्या क्रमांकांसाठी प्रादेशिक परिवहन लिलाव जाहीर करते. त्यातून त्या क्रमांकांवर बोली लावली जाते. त्यात सर्वाधिक किंमत मोजणाºयास तो क्रमांक दिला जातो. अशा प्रकारे प्रत्येक नव्या सीरियलच्या सुरुवातीस या क्रमांकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लिलाव जाहीर करते.त्यानुसार मिळणारे उत्पन्न त्या-त्या प्रादेशिक परिवहनच्या महसुलात जमा होते.अशा प्रकारे उत्पन्नात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. नव्या सीरियलप्रमाणे येणारा क्रमांक वाहनधारकास नको असेल तर त्यासाठी जंपिंगची सुविधाही कार्यालयाने केली आहे. त्यात तीन हजार रुपयांचे शुल्क मोजावे लागतात.हव्या त्या क्रमांकापोटी मोजले चार लाखयंदाही कोल्हापूर जिल्ह्यातून आकर्षक क्रमांकांपोटी झालेल्या लिलावात एका क्रमांकासाठी एका वाहनधारकाने तब्बल चार लाख रुपये मोजले आहेत; तर २० ते ५० हजार रुपयांच्या किमतीच्या क्रमांकापोटी ६५७ जणांनी १ कोटी ७६ लाख १० हजार रुपये व १ लाख ते २.५ लाख रुपये किमतीच्या क्रमांकापोटी नऊजणांनी १४ लाख १० हजारांचा महसूल जमा केला आहे. या क्रमांकापोटी लाखो रुपये मोजण्याची खासियत कोल्हापूरकरांनी आजही जपली आहे. त्यामुळे महसुलात वाढ होत आहे.वर्षभरात जमा झालेला महसूलकार्यालय वाहनधारक महसूलसंख्याकोल्हापूर १०,४८७ ७ कोटी ४ लाख ७४ हजारसांगली ५१८ ३६ लाख ५० हजारसातारा ४,४२६ ३ कोटी १२ लाख ९२ हजारएकूण १५, ४३१ १० कोटी ५४ लाख १६ हजार