शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशनचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:37 IST

महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे

ठळक मुद्देशासनाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश : हयगय करणाऱ्यांवर होणार कारवाई

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे.राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख ४९ हजार ५२१ रेशनकार्डधारक असून, रेशन दुकानांची संख्या १५७२ आहे. रेशनवर गहू, तांदूळ, डाळ असे धान्य ग्राहकांना वाटप केले जाते; परंतु बहुतांश दुकानदार हे रेशनवरील धान्य महिन्यातील काही दिवसांपर्यंतच वाटून नंतर दुकान बंद करणे किंंवा धान्य शिल्लक न ठेवणे असे प्रकार करीत आहेत.

या संदर्भात सन २०१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शिवाजीराव नाईक यांनी, रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती व जबाबदारी रेशन दुकानदारांवर टाकावी, अशी सूचना केली होती. त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अवर सचिव पी. जी. चव्हाण यांनी नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये ग्राहक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशनवरील धान्य घेण्यास आल्यावर त्याला धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास संबंधित दुकानदारांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे दुकानदारांना कळविण्यात आल्याचे म्हटले आहे.

ग्राहकाच्या सोयीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यामुळे ती महिनाभर सुरू असली पाहिजेत, अशीच ग्राहकांची भावना आहे. परंतु बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही दुकाने सुरू नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुकानदारांना आता महिनाभर दुकानात थांबून ग्राहकांना धान्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. 

 

शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य विक्री सुरू असते. तसेच ‘धान्य घेऊन जावे’ असे मोबाईलद्वारे ग्राहकांना कळविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असावा.- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय