दत्तवाड (ता. शिरोळ) येथील लठ्ठे एज्युकेशन सांगली संचलित बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्र निकेतन विद्यालय हे महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न आहे.
चालू वर्षात २ डिसेंबरला केलेल्या गुणवत्ता व सर्वांगीण विकासाच्या निकषावर विद्यालयास सर्वोच्च अ मानांकन श्रेणी प्राप्त झाली आहे. या विद्यालयामुळे कृषी संशोधन विकास विविध उपक्रम, शैक्षणिक पद्धती, कृषी आधारित उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, इनोवेशन या विषयाची माहिती विद्यार्थी, पालक व शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळण्यास मदत होते.
चालू शैक्षणिक वर्षात या केंद्रांतर्गत हरितगृह चालक, माळी प्रशिक्षण केंद्र, उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन, औषधी वनस्पती ओळख व संवर्धन हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, असेही अध्यक्ष कांते यांनी सांगितले. यावेळी सचिव सुहास पाटील, अरुण पाटील, सुकुमार सिदनाळे, प्राचार्य एस. डी. लाड उपस्थित होते.