शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडवरून ‘रास्ता रोको’, पाऊण तास वाहतुकीची कोंडी; नागरिकांचा प्रचंड रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:14 IST

अनेक वेळा आंदोलन करूनही फुलेवाडी - नवीन वाशी नाका - कळंबा रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगरसेवकांची विनंतीही झुगारून कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा हे दोन्हीही महामार्ग सुमारे पाऊण तास रोखल्याने या मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.

ठळक मुद्देरिंग रोडवरून ‘रास्ता रोको’, पाऊण तास वाहतुकीची कोंडी; नागरिकांचा प्रचंड रोषफुलेवाडीनजीक रास्ता रोको, अधिकाऱ्यांशी आंदोलकांची वादावादी

कोल्हापूर : अनेक वेळा आंदोलन करूनही फुलेवाडी - नवीन वाशी नाका - कळंबा रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगरसेवकांची विनंतीही झुगारून कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा हे दोन्हीही महामार्ग सुमारे पाऊण तास रोखल्याने या मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.

यावेळी दोन्हीही आंदोलनस्थळी पोलीस आणि नगरसेवकांची आंदोलकांशी शाब्दिक वादावादी झाल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. अखेर रिंग रोडचे पॅचवर्क करण्याचे काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व विजयसिंह देसाई व राजू जाधव यांनी केले.

फुलेवाडीनजीक रास्ता रोको, अधिकाऱ्यांशी आंदोलकांची वादावादी

कोल्हापूर शहराबाहेरून येणारी वाहतूक रिंग रोडमार्गे शहराबाहेर जावी, या उद्देशने रिंग रोडची निर्र्मिती केली; पण रस्त्यात खड्डे पडल्याने रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी जकात नाका येथे सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केले.रिंग रोडवरील वसलेल्या अनेक कॉलन्यांतील नागरिक विजयसिंह देसाई यांच्या नेतृत्वाखाली सकाळी एकत्र आले. त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणा देत कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी जकात नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले.महापालिकेचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर पोलिसांच्या विनंतीनुसार त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात विजयसिंह देसाई, प्रशांत मोरे, युवराज गोसावी, नीलेश देसाई, तानाजी फाले, लल्लू तोरस्कर, राजू जाधव, संतोष मोरबाळे, विनायक मोरे, बाळ पोवार, बी. एस. पाटील, रंगराव पाटील, युवराज सुतार, अमोल वायदंडे, अक्षय मोरे, बयाजी शेळके, श्रीकाांत गोसावी, मारुती माने, आदींचा सहभाग होता.शहर अभियंत्यांना पोलीस अधिकारी, आंदोलकांनी धरले धारेवरआंदोलन संपल्यानंतर सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचलेले महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह आंदोलकांनी धारेवर धरले. पोलिसांनी २९ वेळा फोन करूनही तो तुम्ही उचलला तर नाहीच; पण तुम्ही उशिरा पोहोचता, ही तुमची भूमिका योग्य नसल्याचे सांगितले.

वाहतुकीची कोंडीउपनगर तसेच ग्रामीण भागांतून नोकरी अगर इतर कामानिमित्त सकाळी कोल्हापूर शहरात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सकाळी आंदोलनावेळी वाहनांची मोठी कोंडी झाली. आंदोलनठिकाण ते फुलेवाडी जुना जकात नाक्यापर्यंत तर पश्चिमेस सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर