शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘दक्षिण’च्या २० ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेचअमर पाटील ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासाठी या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकत पुढील पाया भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.विधानसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासाठी या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकत पुढील पाया भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थेट सरपंच निवडीने वेगळी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. यंदा सदस्य एका पक्षाचा व सरपंच एका पक्षाचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याच पक्षाचा सरपंच खुर्चीत विराजमान व्हावा यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासह शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे.२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी खुला पुरुष-८, खुला महिला-६, ओबीसी पुरुष-१, महिला-४, अनुसूचित जाती पुरुष-१, महिला -१ असे आरक्षण आहे. खुल्या वर्गातील १४ सरपंच दावेदार असल्याने निवडणुका रंगतदार होणार हे निश्चित. दक्षिणमधील ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसआडून सतेज पाटील गटाचे वर्चस्व होते. आमदार अमल महाडिक यांच्या विजयाने मधल्या काळात महाडिक गटाआडून भाजपने विस्तार वाढविण्यावर भर दिला. कॉँग्रेसच्या ताब्यात असणाºया ग्रामपंचायती ताब्यात घेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. पण ग्रामीण भागातील शिवसेनेची ताकदही दुर्लक्षित करता येणार नाही. या निवडणुकांत शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत यश न मिळाल्याने राष्टÑवादी दक्षिणेत खिळखिळी झाली आहे. अटीतटीच्या लढती होणाºया या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत महाडिक गटास भाजपची साथ मिळणार आहे. नोटाबंदी व कर्जमाफीनंतर होणाºया निवडणुकीत पक्षांच्या अस्तित्वाचा लढा होत आहे. स्थानिक नेतृत्वाला हाताशी धरत कॉँग्रेसचा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी प्रचार करताना विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. ग्रामपंचायतीआडून पाटील-महाडिक गटांत रस्सीखेच सुरू असून, दक्षिणचे राजकीय वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे.दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीवळिवडे, वसगडे, नेर्ली, विकासवाडी, कळंबा, पाचगाव, नागाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, कणेरी, कणेरीवाडी, दिंडनेर्ली, हणबरवाडी, कावणे, दºयाचे वडगाव, चुये, निगवे खालसा, उचगाव, कंदलगाव, मोरेवाडी.