शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 04:40 IST

राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे (रानमांजर, लेपर्ड कॅट) दर्शन झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे (रानमांजर, लेपर्ड कॅट) दर्शन झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात ठाणे येथून आलेल्या दाम्पत्याला भर दुपारी या वाघाटीचे दर्शन झाले. या दुर्मीळ प्राण्यांच्या दर्शनामुळे दाजीपूरच्या जंगलाचे जैवविविधतेतील महत्त्वपूर्ण स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दाजीपूरचे हे जंगल युनेस्कोने ‘जागतिक निसर्ग वारसास्थळ’ म्हणून घोषित केले आहे. या जंगलात वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, वनस्पतींचा आढळ आहे. येथे ३५ पेक्षा अधिक प्रकारचे प्राणी आहेत; परंतु येथील जंगल सफारीदरम्यान प्राणी दर्शन होत नाही, म्हणून अनेक पर्यटक नाराज होतात.काही पर्यटकांना मात्र, नेहमी गवा, सांबर, भेकर, डुक्कर, वानर यांसारखे वेगवेगळे प्राणीदर्शन होते. ठाण्यातील पूनम आणि निर्मलकुमार कुर्वे या दाम्पत्याला शनिवारी दाजीपूरच्या जंगलामध्ये १५ मिनिटे ‘वाघाटी’चे दर्शन झाले. या परिसरात त्यांना १०० ते २०० फुलपाखरांचा थवाही दिसला.>वाघाटी म्हणजे कोण?‘वाघाटी’ हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात आणि ते बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृतीच वाटते; परंतु हा मार्जार कुळातील प्राणी आहे. याचा वावर ब्रह्मदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशांत आहे. कर्नाटक आणि केरळमधील सह्याद्रीच्या रांगांत या प्राण्याची उपजात आढळून येते. वाघाटीचे दर्शन दुर्मीळ असते. दाट जंगलझाडी असलेल्या प्रदेशातच यांचा अधिवास असतो.>जंगल सफारी करताना गेल्या आठवड्यात भरदुपारी आम्हाला रस्त्याच्या मधोमध बसलेले हे वाघाटी दिसले, अतिशय दुर्मीळ असलेले हे वाघाटी पाहून आम्हाला खूप आनंद झाला. दुरून पाहताना बिबट्याचा बछडाच वाटत होता; पण जवळून पाहिल्यानंतर ते वाघाटी असल्याचं लक्षात आले. एक अविस्मरणीय अनुभव या जंगलाने आम्हाला दिला.- डॉ. प्रा. पूनम कुर्वे,समन्वयक, डिपार्टमेंट आॅफ बायोडायव्हेर्सिटी वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड मॅनेजमेंट, बांदोडकर कॉलेज आॅफ सायन्स, ठाणे